

Activists angry over candidate's defeat, Vanchit Bahujan Aghadi protests
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा
देशभरातील निवडणुकांमध्ये : - वापरल्या जाणाऱ्या ईव्हीएम ( - EVM) मशीनमुळे लोकशाहीचा खून होत असल्याचा आरोप करत, सोमवारी (दि. २६) वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संजयनगर, = मुकुंदवाडी येथे तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी - ईव्हीएम मशीन आणि सत्ताधारी पक्षाचे - आमदार नारायण कुचे यांच्या - प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देऊन आपला रोष व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक २४ मधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सतीश गायकवाड यांच्या पराभवानंतर स्थानिक नागरिकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. सत्ताधारी पक्षाने सत्तेचा दुरुपयोग करून आणि ईव्हीएम मॅनेज करून हा पराभव घडवून आणला, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर सोमवारी संजयनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर शेकडो आंबेडकरी अनुयायांनी हे प्रतिकात्मक फाशी आंदोलन केले.
ईव्हीएम, सत्ताधाऱ्यांविरुद्ध घोषणाबाजी
आंदोलनाच्या सुरुवातीला कार्यकर्त्यांनी ईव्हीएम आणि सत्ताधारी पक्षाविरुद्ध घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. त्यानंतर ईव्हीएम आणि आमदार नारायण कुचे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला फाशी देण्यात आली. तसेच ईव्हीएमवर बंदी व बॅलेट पेपरवर निवडणुका होत नाहीत, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही, अशी आक्रमक भूमिका यावेळी मांडण्यात आली. निदर्शनात आसाराम गायकवाड, बबन कदम, देविदास येवले, जोगदंड, प्रा. भारत शिरसाट, अॅड. शरद जाधव, अनंत भवरे, सुदर्शन इंगोले व इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.