Sambhajinagar Encroachment Campaign : जालना रोडसह उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई होणारच : पोलिस आयुक्त

मनपा आयुक्तांसोबत बैठकीत ठरला रोडमॅप
Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : जालना रोडसह उर्वरित अतिक्रमणांवर कारवाई होणारच : पोलिस आयुक्त File Photo
Published on
Updated on

Action will be taken against remaining encroachments including Jalna Road: Police Commissioner

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मुकुंदवाडीत खुनाच्या घटनेनंतर अतिक्रमणावर सुरू झालेली कारवाई जालना रोडवर येताच गुंडाळण्यात आल्याने मनपावर टीकेची झोड उठली आहे. बड्यांच्या मालमत्ताना अभय दिले जात असल्याची ओरड झाली. दरम्यान, जालना रोड, चंपा चौक, हसूल, दिल्लीगेट या रस्त्यावरील अतिक्रमणे कायदेशीर मागनि पण करणे हा हेतू असून, कोणाचे नुकसान होऊ नये याची आम्ही काळजी घेत आहोत, असे पोलिस आयुक्तांनी बुधवारी (दि.६) माध्यमांशी बोलताना सांगितले.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Crime : अर्ध्या रस्त्यातून नवरी पसार, साताऱ्याच्या तरुणाची फसवणूक; साथीदारांनी गाडी अडवून केली मारहाण

महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्यासमवेत अतिक्रमणासंदर्भात पोलिस आयुक्तालयात बैठक पार पडली. यावेळी पोलिस आणि मनपा प्रशासनातील सर्व वरिष्ठ अधिकारी, डीसीपी, एसीपी, सर्व ठाण्याचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. या बैठकीत कारवाईसंबंधी रोडमॅप तयार करण्यात आला. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त म्हणाले की, अतिक्रमणावर कारवाई करताना मनपासोबत आमचे पोलिस अधिकारी, कर्मचारी रस्त्यावर असतात. लोकांना पोलिस सामोरे जातात. त्यामुळे कायदेशीर बाजू पोलिसांना माहिती असायला हव्यात त्यासाठी ही बैठक होती. काही सूचना आम्ही केल्या आहेत. त्यामध्ये महापालिकेने अगोदर लोकांशी संवाद साधला पाहिजे.

लाऊडस्पीकरवर अतिक्रमणासंबंधी सूचना द्याव्यात. कायदेशीर नोटीस बजावण्यात याव्यात. त्यानंतर मार्किंग केले जावे. त्या त्या भागात जाऊन लोकांच्या बैठका घ्या. आमचे डीसीपी, एसीपी, ठाणेदार बैठकीला येतील.

Sambhajinagar Encroachment Campaign
संतापजनक : पुन्हा एका १३ वर्षीय विद्यार्थिनीवर रिक्षाचालकाने टाकला हात, शहरातील शालेय विद्यार्थिनी असुरक्षित

संवादातून मार्ग निघतो. लोकांचे नुकसान होईल, अशी कारवाई नको. त्यांना पत्रे, दरवाजे, दुकानातील साहित्य स्वतःहून काढून घेऊ द्या. थेट पाडापाडी टाळून शांततेत कारवाई करावी, अशा सूचना दिल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.

नागरिक मित्र पथकाची अरेरावी रोखा

अतिक्रमण पाडापाडी, रस्त्यावरील वाहनावर कारवाई दरम्यान, अरेरावी, दमदाटी करणाऱ्या मनपाच्या नागरिक मित्र पथकाच्या अनेक तक्रारी येत आहेत. अतिक्रमण कारवाईत तर थेट नागरिकांशी भिडून वाद घातले जात असल्याचे प्रकार निदर्शनास आले. याबाबत बोलताना पोलिस आयक्त म्हणाले की, मनपा आयुक्तांशी याबाबत बोलणे झाले. अतिक्रमण कारवाई ही पोलिसांच्या उपस्थितीत होईल. पोलिसांच्या सूचनेप्रमाणेच नागरिक मित्र पथक काम करेल, असे कळविले आहे. यापूर्वी हेच पथक पोलिसांप्रमाणे खाकी वर्दी घालून रस्त्यावर उतरल्याने पोलिस आयुक्तांनी संताप व्यक्त केला होता. त्यानंतर ती वर्दी हटविण्यात आली होती.

अगोदर नो पार्किंग झोन करा

स्मार्ट पार्किंग करण्यापूर्वी अगोदर नो पार्किंग झोन निश्चित करा. त्यामुळे वाहनांना शिस्त लागून ते स्मार्ट पार्किंगचा वापर करतील. त्या पार्किंगचे दर हे सर्वसामान्यांना परवडणारे असावे, अशी सूचना पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी मनपाला केली आहे. शहराचा हॉकर्स झोन, पार्किंग हे प्रश्न मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्हीची व्यवस्था करावी. चोरीच्या दुचाकी अनेक वेळा चोरटे पार्किंगमधून चोरतात. सीसीटीव्हीमुळे हे प्रकार थांबतील. वाहतूक शाखेचे एसीपी सुभाष भुजंग पार्किंगसंबंधी मनपाशी समन्वय ठेवून आहेत.

विरोध टाळण्यासाठी संयुक्त बैठका

अतिक्रमण काढताना होणारा विरोध टाळण्यासाठी मनपा आणि पोलिस प्रशासनातील अधिकारी संबंधित ठिकाणी जाऊन नागरिकांशी संवाद साधणार आहेत. त्यांना कायदेशीर बाजू समजावून सांगण्यात येईल. अनेकवेळा अफवाच जास्त असतात. मात्र, त्या दूर झाल्यानंतर लोक स्वतःहून आपले अतिक्रमण काढून घेत असल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news