Sambhajinagar Encroachment Campaign : राजकीय दबावापोटी जालना रोडवरील कारवाईला ब्रेक

कायदेशीर पळवाटीसाठी मनपाकडून प्रतिष्ठित व्यापाऱ्यांना वेळ का
Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : राजकीय दबावापोटी जालना रोडवरील कारवाईला ब्रेकFile Photo
Published on
Updated on

Action on Jalna Road stopped due to political pressure

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महापालिकेकडून सध्या शहरात अतिक्रमण हटावची जोरदार मोहीम सुरू असून, यात गोरगरिबांच्या घरांची मोठ्याप्रमाणात पाडापाडी सुरू आहे. मात्र शहराची लाईफ लाईन असलेल्या जालना रोडवरील सेव्हनहिल ते महावीर चौक (बाबा पंप) हा रस्ता ४५ मीटरचा असून, सिडको बसस्थानक ते सेव्हनहिल या ६० मीटर रोडवरील अतिक्रमण न हटविण्याच्या कारवाईसाठी महापालिकेवर जोरदार राजकीय दबाव निर्माण झाल्याची माहिती पुढे आली आहे. यात विशेषतः सत्ताधारी व विरोधी पक्षातील काही स्थानिक नेत्यांनी महापालिका प्रशासनावर कारवाई थांबविण्यासाठी दबाव टाकल्याचे समजते.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar News : कन्नड न.प.चे व्यापारी संकुल कोसळले, सुदैवाने जीवित हानी टळली

महानगरपालिकेने जालना रोडवरील मुकुंदवाडी, सर्जयनगर, एपीआय कार्नरसह चिकलठाणा ते केंब्रीज चौकापर्यंतची कच्ची, पक्की अनधिकृत बांधकामे हटवली. यात या भागातील घरे, इमारतींवर बुलडोजर चालवण्यात आले. त्यामुळे अनेक गोरगरिबांचे संसार उघड्यावर आले. मात्र सिडको बसस्थानक ते सेव्हनहिल या भागातील हितसंबंध गुतलेल्या प्रतिष्ठित व्यावसायिकांकडून कारवाईस विरोध दर्शवण्यात आला.

यात काही राजकीय नेत्यांनी व्यापाऱ्यांच्या मागण्यांना समर्थन दिले असून, महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट फोन करून कारवाई थांबवण्याचा आग्रह केला, अशी माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे गोरगरिबांच्या मालमत्तांवर धडक कारवाई करणाऱ्या महापालिकेकडून या बड्या प्रतिष्ठातांना कायदेशीर पळवाटीसाठी वेळ देण्याचे धोरण अवलंबण्यात आले असल्याची चर्चा आहे. तर महापालिका कारवाई करताना निवडक ठिकाणांना लक्ष करत असून, अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या दुकानांना नोटीस न देता थेट हटवण्याचे प्रकार घडत आहेत, असा आर-रोप जालना रोडवरील व्यापा-यांकडून करण्यात येत आहे.

Sambhajinagar Encroachment Campaign
Sambhajinagar Encroachment Campaign : पडेगाव रोडवरही उडाला धुराळा, ५८५ अतिक्रमण भुईसपाट

यामुळे व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष पसरला असून, याचा फायदा घेत काही राजकीय नेत्यांनी वजन वापरून कारवाई स्थगित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी मात्र कारवाई ही नियमानुसार आणि न्यायालयाच्या आदे-शानुसार होत असल्याचे म्हणत आहेत. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कारवाई सुरू ठेवण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news