Sambhajinagar News : कन्नड न.प.चे व्यापारी संकुल कोसळले, सुदैवाने जीवित हानी टळली

नगर परिषद व्यापारी संकुल इमारतीचा वरचा मजला हा जीर्ण झाला होता.
Sambhajinagar News
Sambhajinagar News : कन्नड न.प.चे व्यापारी संकुल कोसळले, सुदैवाने जीवित हानी टळलीFile Photo
Published on
Updated on

Kannada Nagar Parishad Commercial Complex collapses

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : येथील तहसील कार्यालय मुख्य रस्त्यावरील नगर परिषदेचे दुमजली व्यापारी संकुल गुरुवारी (दि.३) दुपारी तीन वाजेच्या सुमारास कोसळले. इमारतीतील गाळेधारक व नागरिकांनी प्रसंगवधान राखून तात्काळ परिसर रिकामा केल्याने जीवित हानी झाली नाही.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : पं. स. इमारत दुरुस्ती कामाची कर्मचाऱ्यांकडून पोलखोल

नगर परिषद व्यापारी संकुल इमारतीचा वरचा मजला हा जीर्ण झाला होता. काही दिवसांपूर्वी त्यास तडे गेले होते. इमारत पडण्याची चिन्हे दिसताच इमारतील दुकानदारांनी सतर्क होऊन दुकानाबाहेर धाव घेतली. परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करत रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, नागरिकांना इमारतीपासून बाजूला करून परिसर रिकामा केला.

तीनच्या सुमारास बघता बघता इमारत चित्रपटातील एखाद्या प्रसंगासारखी कोसळली. इमारत वर्दळ असलेल्या मुख्य रस्त्यावर असल्याने नगर परिषद प्रशासनाने तात्काळ जेसीबीच्या सहाय्याने इमारतीचे मटेरियल इतरत्र हलविण्याचे काम हाती घेतले ते रात्री उशिरापर्यंत सुरू होते.

सोमवार असता तर...

सोमवार हा शहराचा आठवडी बाजाराचा वार असून, बाजारात जाण्यासाठी तहसील व नगरपरिषद इमारत समोरील असणारा हा मुख्य रस्ता आहे. सोमवारी याच रस्त्यावर वाहनांसह नागरिकांची मोठी गर्दी असते. जर सोमवारी ही घटना घडली असती तर तारांबळ उडून मोठे संकट ओढवले असते, असे मत नागरिकांनी व्यक्त केले.

Sambhajinagar News
Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीनिमित्त छोट्या पंढरपुरात जय्यत तयारी

आता गुन्हा कोणावर दाखल करायचा?

शहरात २२ मे च्या मध्यरात्री वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने एका पत्र्याच्या घरावर शेजा? च्या घराची भिंत पडून पाच जणांचे कुटुंब दबल्याची घटना घडली होती. यात आयाशा अशपाक शेख (११) या बालिकेचा मृत्यू झाला होता. यामुळे ओमप्रसाद रामप्रसाद भारुका या इमारत मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर नगर परिषदेने शहरातील जुन्या इमारती मालकांनी स्वतः पाडून घेण्याचे आहवान केले होते, मात्र आता तर नगर परिषदेचीच इमारत पडली असून, गुन्हा कोणावर दाखल करायचा, असा प्रश्न विचारला जात आहे.संपूर्ण इमारत कोसळली नसून, वरच्या मजल्यावरील सात दुकाने गाळ्यांचा स्लॅब को-सळला आहे. ही इमारत जीर्ण झाली असल्याचे नगरपरिषदेच्या लक्षात येताच आम्ही सर्व गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. आजरोजी ७ गाळे आम्ही पाडले आहेत. आता ३८ गाळे असलेली संपूर्ण इमारत व शहरातील नगरपरिषदेच्या जीर्ण झालेल्या सर्व इमारती पाडण्याचा प्रस्ताव तयार करून प्रशासक असलेल्या संतोष गोरड यांच्याकडे सादर करणार आहोत.

संपूर्ण इमारत कोसळली नसून, वरच्या मजल्यावरील सात दुकाने गाळ्यांचा स्लॅब को-सळला आहे. ही इमारत जीर्ण झाली असल्याचे नगरपरिषदेच्या लक्षात येताच आम्ही सर्व गाळेधारकांना गाळे खाली करण्यासाठी नोटीस दिल्या होत्या. आजरोजी ७ गाळे आम्ही पाडले आहेत. आता ३८ गाळे असलेली संपूर्ण इमारत व शहरातील नगरपरिषदेच्या जीर्ण झालेल्या सर्व इमारती पाडण्याचा प्रस्ताव तयार करून प्रशासक असलेल्या संतोष गोरड यांच्याकडे सादर करणार आहोत.
ऋषिकेश भालेराव, -मुख्याधिकारी नगरपरिषद कन्नड
66 मे महिन्यात झालेल्या पावसाचे दीड फूट पाणी इमारतीच्या वरच्या मजल्यावर साचले होते. त्यावेळी मी स्वतः व गाळेधारकांनी प्रशासक संतोष गोरड यांना पाणी साचले असल्यामुळे इमारत कोसळू शकते, अशी शंका उपस्थितीत केली होती. प्रशासक यांनी याकडे दुर्लक्ष केले. ते पाणी भिंतीत मुरले. त्याचवेळी जर स्लॅबवर साचलेले पाणी काढले असते तर हा प्रकार घडला नसता. या घटनेला खऱ्या अर्थान प्रशासक जबाबदार आहेत.
- संतोष कोल्हे, माजी नगराध्यक्ष कन्नड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news