Accident News : डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : सुसाट ट्रॅव्हल्सच्या धडकेत नीट उत्तीर्ण विद्यार्थ्याचा करुण अंत

फूड डिलेव्हरी देण्यासाठी मित्रासोबत जाताना अदालत रोडवर भीषण अपघात
Accident News
Accident News : डॉक्टर होण्याचे स्वप्न अधुरे : सुसाट ट्रॅव्हल्सच्या धडकेत नीट उत्तीर्ण विद्यार्थ्याचा करुण अंतfile photo
Published on
Updated on

Accident News: A student who passed the NEET exam met a tragic end in a collision with a travel van

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेतकरी वडिलांचे आणि ताईचे स्वप्न पूर्ण करत डॉक्टर बनण्याची जिद्द उराशी बाळगलेल्या एका होतकरू विद्यार्थ्याचा सुसाट ट्रॅव्हल्सच्या धडकेत करुण अंत झाला. सोमवारी (दि.२१) मध्यरात्री अदालत रोडवर हा भीषण अपघात घडला. गणेश कैलास निर्मळ (२०, मूळ रा. ता. खामगाव, जि. बुलढाणा) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. नुकत्याच झालेल्या 'री-नीट' परीक्षेत घवघवीत यश मिळवल्यानंतर पुढील प्रवेशाच्या मार्गदर्शनासाठी तो शहरात आला होता, मात्र काळाने त्याच्यावर अचानक घाला घातला.

Accident News
Sambhajinagar News : गांधी भवनसमोर भाजप-काँग्रेसचे कार्यकर्ते आमने-सामने

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेशचा मित्र अक्षद जाधव (रा. प्रताप चौक, वाळूज) हा शहरात डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. रविवारी रात्री अक्षदला आलेली एक ऑर्डर पूर्ण करण्यासाठी गणेश त्याच्यासोबत दुचाकीवरून (एमएच- २९- ई -३८४५) गेला होता. सोमवारी पहाटे अदालत रोडवरून जात असताना मागून सुसाट आलेल्या एका खासगी ट्रॅव्हल्स बसने (एमपी-०९- डीएच ०४९२) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण धडकेत दुचाकीच्या मागे बसलेला गणेश रस्त्यावर फेकल्या गेला आणि त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला. तर दुचाकीचालक अक्षद हा जखमी झाला. अपघातानंतर जखमी तरुणांना मदत करण्याऐवजी ट्रॅव्हल्स चालकाने घटनास्थळावरून पोबारा केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. जखमी अक्षद याच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पसार बसचालक शेख रियाज शेख अली (रा. जि. हिंगोली) याच्याविरुद्ध वेदांतनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Accident News
Crime News : औरंगपुऱ्यात दुचाकीचा धक्का लागल्यावरून तणाव

ताईसारखे 'डॉक्टर' होण्याचे स्वप्न राहिले अपुरेच... गणेशचे वडील खामगाव येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गणेशला दोन बहिणी असून, तो घरात एकुलता एक होता. त्याची मोठी बहीण डॉक्टर असून, गणेशलाही ताईसारखेच डॉक्टर होऊन वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यासाठी त्याने खामगाव सोडून लातूर येथे जाऊन 'नीट' परीक्षेची तयारी केली होती.

पेपरफुटीच्या गोंधळानंतर नुकत्याच झालेल्या 'री-नीट' परीक्षेत त्याने जिद्दीने ४१० गुण मिळवले होते. आता पुढे मेडिकलला प्रवेश मिळवण्यासाठी काय पर्याय असू शकतात, याचे मार्गदर्शन घेण्यासाठीच तो छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. मात्र या दुर्दैवी अपघातात कुटुंबाची एकुलती एक आशा हरपल्याने निर्मळ कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news