Tempo-Bike Accident : भाच्याच्या लग्नाला जाणाऱ्या मामावर काळाचा घाला

जिकठाण फाट्यालगत अपघात; दुचाकीस्वार ठार, मुलगी जखमी
Tempo-Bike Accident
Tempo-Bike Accident : भाच्याच्या लग्नाला जाणाऱ्या मामावर काळाचा घालाFile Photo
Published on
Updated on

Accident near Jikthan Fata; Bike rider killed, girl injured

वाळूज, पुढारी वृत्तसेवा : भाचीच्या लग्नासाठी चाळीसगावकडे जात असलेल्या मामाचा झालेल्या अपघातात करुण अंत झाला. सदरची घटना छत्रपती संभाजीनगर ते पुणे महामार्गावर असेलेल्या जिकठाण फाट्यालगत बुधवारी (दि. २६) सकाळी ७वाजेदरम्यान घडली आहे. या घटनेत बाबुसिंग सोबकचंद मेहेर (४५, ह.मु.ढोरेगाव, मूळ रा. पेंढापूर, ता. गंगापूर) असे मृत दुचाकीस्वार मामाचे नाव आहे. तर त्यांची मुलगी जखमी झाली आहे.

Tempo-Bike Accident
Ramai Gharkul : मनपाकडून रमाई घरकुलची जुनी यादी रद्द

याविषयी माहिती अशी की, बाबूसिंग सोबकचंद महेर हे बुधवारी सकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दुचाकी (एमएच- २०, डीयू ०५४१) वर मुलगी आंचल हिला घेऊन ढोरेगाव येथून चाळीसगावकडे निघाले होते. त्यांची दुचाकी छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील जिकठाण येथे येताच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात मेहेर हे गंभीर जखमी झाले.

तर मुलगी आंचल ही जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच अॅम्बुलन्स चालक शुभम वाघमारे यांनी घटनास्थळी धाव घेत मेहेर यांना गंगापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तर जखमी आंचल हिच्यावर छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातात ठार झालेल्या बाबूसिंग मेहेर यांनी दुचाकीवर हेल्मेट घातलेले होते. मात्र अपघात एवढा भीषण होता की मेहेर यांचा जागेवरच मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद घेतली आहे. दरम्यान या आकमित घटनेमुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

Tempo-Bike Accident
Sambhajinagar News : गोल्फ क्लब रस्त्यावरील ५५ मालमत्ता भुईसपाट

टेम्पो धडक देऊन पसार

जिकठाण फाट्यालगत विरुध्द दिशेने भरधाव वेगात आलेल्या टेम्पो चालकाने मेहेर यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यात बाबूसिंग मेहेर हे ठार होऊन त्यांची मुलगी जखमी झाली. अपघातानंतर टेम्पोचालकाने घनास्थळावरून धूम ठोकली. असे काही प्रत्यक्षदर्शीचे म्हणणे आहे. या अपघाताची चौकशी करून धडक देणाऱ्या वाहनचालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी येथून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news