Ramai Gharkul : मनपाकडून रमाई घरकुलची जुनी यादी रद्द

नव्या ऑनलाईन नोंदणीवर भर : एजंट सक्रिय असल्याची चर्चा
Gharkul
Ramai Gharkul : मनपाकडून रमाई घरकुलची जुनी यादी रद्दPudhari News Network
Published on
Updated on

Municipal Corporation cancels old list of Ramai Gharkul

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : रमाई घरकुल योजनेत मोठा बदल करत महापालिकेने जुनी ऑफलाईन यादी रद्द केल्याची माहिती सूत्रांनी दिली असून, नागरिकांकडून पूर्वी जमा झालेले सुमारे सहा हजार ऑफलाईन अर्ज निकाली काढत एप्रिलपासून नव्या ऑनलाईन पोर्टलद्वारे अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. या प्रक्रियेत काही एजंट सक्रिय असल्याच्या चर्चेने शहरात जोर धरला आहे.

Gharkul
Shendra MIDC : एमआयडीसीत कारवाईचे 'दिवे' कधी लागलेच नाही

परंतु या नव्या पद्धतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून आतापर्यंत तब्बल ८ हजार २ ऑनलाईन अर्ज महापालिकेकडे दाखल झाले आहेत. महापालिकेकडून रमाई योजनेत पारदर्शकता ठेवण्याच्या उद्देशाने ऑनलाईन नोंदणी अनिवार्य, असा निर्णय घेण्यात आला असला तरी या प्रक्रियेत काही एजंट सक्रिय असल्याची चर्चा शहरात जोर धरला आहे. अर्ज भरणे, कागदपत्रे अपलोड करणे, पडताळणी अशा कारणांवरून काही जण नागरिकांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी अनौपचारिकरीत्या समोर येत आहेत. मात्र, महापालिका प्रशासनाने अशी कोणतीही दलाली मान्य केली नसून नागरिकांना फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, ऑनलाईन अर्ज प्रक्रियेबरोबरच घरकुलासाठी पात्र लाभार्थीचा प्रत्यक्ष सर्व्हे करण्याचे कामही मनपा प्रशासनाने सुरू केले आहे. घरोघरी जाऊन अधिकारी आणि कर्मचारी अर्जदारांची पाहणी करत असून, प्रत्यक्ष परिस्थितीचा अहवाल तयार केला जात आहे. कागदपत्रांची पडताळणी, उत्पन्न निकष, निवासी अटी व बांधकाम योग्य जागेची खातरजमा या सर्व गोष्टी तपासून अंतिम निवड केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Gharkul
Sambhajinagar Accident : सुसाट कारने दुचाकीस्वार प्राध्यापकाला चिरडले

दरम्यान जुनी ऑफलाईन यादी रद्द केल्याने काही अर्जदार नाराज असले तरी महापालिकेच्या मते जुन्या यादीत त्रुटी व अपूर्ण तपशील मोठ्या प्रमाणात असल्याने नवी यादी तयार करणे अपरिहार्य होते. ऑनलाईन प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि नियंत्रणात राहील, असा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

अधिकृत पोर्टलवर करा अर्ज !

नव्या नियमांनुसार पात्रता असलेल्या सर्व नागरिकांनी कोणत्याही एजंटवर विश्वास न ठेवता थेट अधिकृत पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अंतिम याद्या तयार होईपर्यंत सखोल पडताळणी व सर्व्हे प्रक्रियेमुळे रमाई घरकुल योजनेचे कामकाज आणखी काही आठवडे सुरू राहणार असल्याची शक्यता व्यक्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news