young man death
डिस्क ब्रेक दाबल्याने अपघात; तरुणाचा मृत्यूFile Photo

डिस्क ब्रेक दाबल्याने अपघात; तरुणाचा मृत्यू

शहराजवळील कन्नड, छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामगोपाल पेट्रोलपंपासमोर दुचाकी चालकाने अचानक डिस्क ब्रेक दाबल्याने झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला.
Published on

Accident due to applying disc brakes; Death of a young man

कन्नड, पुढारी वृत्तसेवा : शहराजवळील कन्नड, छत्रपती संभाजीनगर रोडवरील रामगोपाल पेट्रोलपंपासमोर दुचाकी चालकाने अचानक डिस्क ब्रेक दाबल्याने झालेल्या अपघातात एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.२६) रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.

young man death
वाळू घाटांचे लिलाव होऊनही अवैध उपसा

अरशद गुलाब पठाण (वय १९, रा. कुंजखेडा, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेली अधिकची माहिती अशी की, अरशद हा मित्रासोबत मोटारसायकलवर पाठीमागे बसून जात असताना चालकाने अचानक डिस्क ब्रेक दाबल्याने रामगोपाल पेट्रोलपंपाजवळ तोल जाऊन अरशद उडून रस्त्यावर पडला. यात तो गंभीर जखमी झाला.

young man death
अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वसुलीसाठी बोजा

अपघातानंतर त्याला तातडीने उपचारासाठी कन्नड ग्रामीण रुग्णालय, कन्नड येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा गिते तपासणीनंतर अशरद यास मृत घोषित केले. शनिवारी शवविच्छेदन करून दुपारी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल संजय आटोळे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news