अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वसुलीसाठी बोजा

मधुमक्षिका पालन योजना प्रकरण; कृषी विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनीच शासनाचा चुना लावल्याचा लाभार्थ्यांचा आरोप
Paithan News
अनुदान लाटणाऱ्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वसुलीसाठी बोजाFile Photo
Published on
Updated on

Beekeeping Scheme Case There are allegations that officials and employees of the agriculture department themselves defrauded the government

चंद्रकांत अंबिलवादे

पैठण : कृषी विभागाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखराअंतर्गत पैठण तालुक्यातील विविध गावांमध्ये २०१८ ते २०२४ या कालावधीमध्ये शेतकऱ्यांना व्यक्तिगत लाभ घटकांतर्गत मधुमक्षिका पालन अनुदान वितरित करण्यात आले होते. परंतु तत्कालीन स्थानिक कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बोगस योजना राबवून लाखो रुपयाचा शासनाला चुना लावण्याचा प्रकार मधुमक्षिका संच योजनाधारक लाभाथी शेतकऱ्याकडे आढळून न आल्यामुळे उघड झाले होते. यामुळे कृषी विभागाचे जिल्हा सन्मानवायक समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी दिलीप स्वामी व समिती सदस्याच्या बैठकीत अनुदान लाटणाऱ्या लाभाथी शेतकऱ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर शासकीय अनुदान वसुली बोजा टाकण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी पैठण तालुक्यातील महसूल मंडळ अधिकारी व तलाठी यांना दिल्यामुळे लाभायीत खळबळ उडाली आहे.

Paithan News
chhatrapati sambhaji nagar : वाळू तस्करांमध्ये दोन गटांत मध्यरात्री तुफान राडा

तालुका कृषी विभागांतर्गत २०१८ ते १९, २०२३-२४ या कालावधीत तालुक्यातील विविध गावांत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखराअंतर्गत व्यक्तिगत लाभ घटकांतर्गत मधुमक्षिका पालन योजनेसाठी एका लाभार्थ्यांना १ लाख ६२ हजार रुपये असे २७ लाभार्थ्यांना थेट अनुदान बँक खात्यात जमा केले होते. या लाभायीमागे १५ लाभार्थ्यांनी ३० हजार रुपये अंशत रक्कम प्रकल्पाच्या खात्यावर जमा केले.

परंतु १५ लाभार्थ्यांनी कुठलीही रक्कम आतापर्यंत परत न केल्यामुळे यासह २७ लाभायींकडून शासकीय अनुदान वसुलीसाठी जिल्हा कृषी अधिकारी व कृषी समन्वय समितीचे प्रमुख जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्याच्या शेती ७/१२ उताऱ्यावर बोजा टाकण्याचे आदेश पैठण तालुक्यातील योजनेचा लाभ घेतलेल्या गावातील मंडळ अधिकारी व तलाठी यांना उपविभागीय अधिकारी नीलम बाफना यांनी दिल्यामुळे लाभ घेत-लेल्या शेतकऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.

Paithan News
वाळू घाटांचे लिलाव होऊनही अवैध उपसा

चोर सोडून संन्याशाला शिक्षा

दरम्यान या शासकीय योजनेच्या नावाखाली झालेल्या घोटाळाप्रकरणी दैनिक पुढारी प्रतिनिधीने सदरील लाभाथी शेतकऱ्यांशी संवाद साधला असता या घोटाळ्यातील धोकेदायक माहिती उघड झाली असून तत्कालीन पैठण तालुका कृषी कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचारी यांनी शेतकरी लाभार्थ्यांना योजना मंजूर करण्याच्या नावाखाली पैसे घेतल्याचा प्रकार निदर्शनास आला. व शासकीय मधुमक्षिका पालन अनुदानाची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांनी शासनाला चुना लावून परस्पर हडपल्याचा आरोप करून ङ्गचोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचा प्रकार संबंधित कृषी विभाग करीत असल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला.

या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर वसुलीसाठी बोजा

दरम्यान पैठण तालुक्यातील वेगवेगळ्या गावातील लाभाथी घेतलेले अनुदान :-गौरव कैलास डाके रा. इनायतपूर (रु. १.६२०००), दिगंबर सखाराम डाके रा. इनायतपूर (रु १.६२०००), अशोक पुंजाराम डाके रा. खादगाव रु. (१.३२०००), भाऊसाहेब रंगनाथ सावंत रा. खादगाव (रु.१.३२०००), कैलास शेषराव कोल्हे रा. खादगाव (रू१.३२०००), कल्पना कैलास डाके रा. खादगाव (रू १.३२०००), लक्ष्मीबाई आप्पासाहेब पेढारे रा. खादगाव (रु १.३२०००), लियाकत इस्माईल शेख रा. खादगाव (रु.१.३२०००), मुरलीधर लिंबाजी काकडे रा. खादगाव (रु. ११०.४००), सर्जेराव लिंबाजी काकडे रा. खादगाव (रू१.३२०००), भाऊसाहेब पारसनाथ मघारे रा. रांजणगाव दांडगा (रु.१.३२०००), मिलिंद शिवाजी मगर रा. रांजणगाव दांडगा (रु १.३२०००),

नारायण परसनाथ मघारे रा. रांजणगाव दांडगा (रु १.३२०००), रावसाहेब परसनाथ मघारे रा. रांजणगाव दांडगा (रु११०.४००), भास्कर गंगाधर हजारे रा. वडजी (रु१.३५०००), धुरपदाबाई गंगाधर हजारे रा. वडजी (रु१.६५०००), गणेश अशोक हजारे रा. वडजी (रु१.६५०००), कल्याण दत्तू भांड रा. वडजी (रु१.६२०००), केदार दिगंबर भांड रा. वडजी (रु१.६५०००), किशोर शिवाजी गोजरे रा. वडजी (रु१.६५०००), कृष्णा राजेंद्र हजारे रा. वडजी (रु१.६५०००), राम अशोक हजारे रा. वडजी (रु१.३५०००), शशिकला श्रीधर गोजरे रा. वडजी (रु १.६५०००), वाल्मीक गंगाधर वीर रा. वडजी (रु १.६२०००) या शासकीय अनुदान घेणाऱ्या लाभार्थ्याच्या ७/१२ उताऱ्यावर शासकीय अनुदान वसुलीसाठी बोजा टाकण्याचा आदेश छत्रपती संभाजीनगर येथील उपविभागीय कृषी अधिकारी यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news