

Accident caused by sand spilled on the road; 1 killed
गारज, पुढारी वृत्तसेवा गारज तालुक्यातील येथील टोलनाक्याजव ळील रस्त्यावर साड लेल्या गारज, पुढारी वृत्तसेवा वैजापूर वाळूमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी (दि.१७) रोजी दुपारी १ वाजेच्या दरम्यान घडली. कीर्तीकांत रामचंद्र कुलकर्णी (वय ४५) रा. रोहिला बु. जिल्हा नाशिक असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
नाशिक जिल्ह्यातील रोहिला येथील गुरू कीर्तीकांत कुलकर्णी हे ताडपिंपळगाव येथे त्यांच्या मामाकडे सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी जात असताना गारज येथील नवीनच काम सुरू असलेल्या टोल नाक्याजवळ शनिवारी दुपारी १ वाजता त्यांची दुचाकी क्र, एम एच २० एल ३१३२ ही रस्त्यावर सांडलेल्या वाळूमुळे दहा पंधरा फुटांपर्यंत घसरून त्यांचे डोके रोडवर आदळल्याने त्यांचा मेंदू बाहेर पडला यामुळे त्यांचा या अपघातात जागेवर मृत्यू झाला.
अपघात इतका भयंकर होता की त्यांच्या मेंदूचे दोन तीन तुकडे रोडवर विखुरलेले होते. यावेळी जवळच अस-लेले अपघात मित्र जाकिर पठाण यांनी धाव घेऊन कीर्तीकांत यांच्या अंगावर पडलेली दुचाकी बाजूला करून रोडवर विखुरलेले मांसाचे तुकडे जमा करून शिऊर पोलिसांना घटनेची माहिती कळवली. घटनेची माहिती मिळताच शिऊर पोलिस ठाण्याचे सपोनी वैभव रणखांब यांनी आपल्या कर्मचारी पोका सविता वरपे यांना घटनास्थळी पाठवले. वरपे यांनी मृतदेह शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. तपास बिट जमादार गणेश गोरक्ष करत आहेत.
वाळूमाफिया विरोधात रोष
कीर्तीकांत कुलकर्णी हे पूजाअर्चा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. वाळूमुळे घसरून पडल्याने गारज येथील तरुणांनी वाळूमाफियांवर रोष व्यक्त केला. तर काहींनी अज्ञात वाहनाने उडविल्याने मेंदूचा चेंदामेंदा झाल्याचा अंदाज व्यक्त केला. याबाबत सीसीटीव्ही तपासावे असे नागरिकांनी नातेवाईकांना सुचविले.