

AIMIM flag hoisted in Shiv Sena's stronghold
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: मागील पस्तीस वर्षांपासून शिवसेनेचा गड असलेल्या गुलमंडीवर प्रथमच एमआयएमची एंट्री झाली आहे. या प्रभागातील चार पैकी शिंदे सेनेचा एक आणि ठाकरे सेनेचा एक नगरसेवक निवडून आला आहे. तर एमआयएमने दोन नगरसेवक निवडून आणत सेनेच्या या बालेकिल्ल्यात मोठ्या दणक्यात आपला झेंडा रोवला आहे.
महापालिकेच्या इतिहासात सुरुवातीपासूनच म्हणजे १९८८च्या निवडणूकापासून गुलमंडीवर शिवसेनेचा दबदबा कायम राहिला आहे. माजी खा. चंद्रकांत खैरे, आ. प्रदीप जैस्वाल आणि माजी आ. किशनचंद तनवाणी यांचे या भागात वर्चस्व राहिले आहे. येथून निवडून आलेले राजकारणात पुढे जातात, असेही बोलले जाते. त्यामुळे या महापालिका निवडणुकीतही सर्वांचेच गुलमंडीवरील लढतीकडे लक्ष लागले होते.
यावेळी प्रभाग पद्धत असल्याने गुलमंडी प्रभागात चार जागांसाठी मतदान झाले. तिथे शिवसेना विरुद्ध भाजप विरुद्ध ठाकरे सेना विरुद्ध एमआयएम अशी लढत बघायला मिळाली. यात एका जागेवर शिवसेनेचे आमदार प्रदीप जैस्वाल यांचे चिरंजीव त्रब्रीकेश यांनी विजय मिळविला. चौथ्या जागेवर ठाकरे सेनेचे माजी नगर मेवक मुत्चिन स्वैरे हे विजयी झाले तर एमआयएमचे तरन्नू अहमेद आणि नूरजहा एकबाल हे दोन नगर-सेवक निवडून आले. त्यामुळे गुलमंडी भागातील चारपैकी दोन नगरसेवक निवडून आणत एमआयएमने सेनेच्या बाल्लेकिल्ल्याला तडा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
सेनेत मत विभाजन, एमआयएमच्या पथ्यावर
गुलमंडी हा सेनेचा गड राहिला आहे. मात्र, चार वर्षांपूर्वी राज्यातील सत्तानाट्यानंतर शिवसेनेचे शिंदे सेना आणि ठाकरे सेना असे दोन गट पडले. दोन्ही सेनेचे उमेदवार एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यामुळे झालेले मत विभाजन हेच एमआयएमच्या पथ्यावर पडले आणि त्यांचे दोन बालेरमेक निवडून आले.
सेनेच्या गडाला तडे, शिवसैनिकांच्या जिव्हारी
गुलमंडीवर सुरुवातीपासून शिवसेनेचाच दबदबा राहिला आहे. मात्र, या निवडणुकीत सेनेच्या बाल्लेकिल्ल्यात एमआयएमची एंट्री होऊन गडाला तडे लागले आहे. यामुळे सेनेच्या दोन्ही गटांतील शिवसैनिकांमध्ये नाराजी असून, गडातील दोन जागांवरील पराभव त्यांच्या जिव्हारी लागला आहे.