

A training center has been arranged for teachers in Gangapur city itself.
रमाकांत बन्सोड
गंगापूर : तालुक्यातील शिक्षकांना तब्बल ३० किलोमीटर दूर वाळूज-बजाजनगर येथे प्रशिक्षणासाठी जावे लागण्याच्या गैरसोयीविरोधात शिक्षकवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत होती. दै. पुढारी प्रशिक्षणासाठी शिक्षकांची गैरसोयफ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या ातमीची प्रशासनाने तात्काळ दखल घेत आता प्रशिक्षणाच्या ठिकाणात महत्त्वाचे बदल केले असून, गंगापूर परिसरातील शिक्षकांसाठी गंगापूर शहरातच प्रशिक्षण केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे.
गंगापूर ते वाळूजदरम्यान सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने शिक्षकांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते. महिला शिक्षिका आणि ज्येष्ठ शिक्षकांसाठी हा प्रवास धोकादायक ठरत होता. त्यातच प्रशिक्षणासाठी टी.ए. न मिळाल्याने शिक्षकांच्या आर्थिक अडचणींमध्ये भर पडत होती. इतर तालुक्यांप्रमाणे बीट-स्तरावर प्रशिक्षणाची व्यवस्था नाही, मग फक्त गंगापूरच्या शिक्षकांनाच इतका त्रास का?
फ्फ असा संतप्त सवाल शिक्षक संघटनांकडून करण्यात आला होता. १७ ते २९ नोव्हेंबरदरम्यान होणारे मूल्यवर्धन प्रशिक्षणही वाळूजमध्येच घेण्याचा प्रशासनाचा अट्टाहास शिक्षकांना असह्य झाला होता. या पार्श्वभूमीवर दै. पुढारीची बातमी प्रसिध्द होताच गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांनी पुनर्विचार सुरू केला.
पहिल्या टप्प्यात स्थानिक शाळांशी संपर्क साधला असता त्यांनी असमर्थता दर्शविली. मात्र शिक्षक संघटनांनी जोरदार निवेदन दिल्यानंतर पुन्हा प्रयत्न देवगिरी ग्लोबल इंग्लिश स्कूल, गंगापूर यांनी दोन टप्प्यांसाठी वर्गखोल्या व भौतिक सुविधा उपलब्ध करण्यास सहमती दर्शविली. यामुळे अखेर शिक्षकांच्या मागणीला न्याय मिळत गंगापुरातच प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे शिक्षकांनी समाधान व्यक्त केले. गंगापुरातील शिक्षकांची गैरसोय होऊ नये म्हणून शक्य ते सर्व पर्याय तपासून गंगापूरमध्ये दोन टप्प्यांचे प्रशिक्षण ठेवण्यात आले आहे, अशी माहिती गटशिक्षणाधिकारी अरविंद कापसे यांनी दिली.
शिक्षकांवरील अनावश्यक ताण कमी होणार
गंगापूर परिसरातील शिक्षकांची मागणी, शिक्षक संघटनांचे प्रयत्न आणि ङ्गङ्खदैनिक पुढारीफ्फच्या बातमीमुळे प्रशासनाला याची दखल घ्यावी लागली. ही आमच्या संघर्षाची व पत्रकारितेच्या दणक्याची मिळून दिलेली मोठी फलश्रुती आहे, असे अनिल काळे म्हणाले. गंगापुरात प्रशिक्षण केंद्र सुरू झाल्याने शिक्षकांवरील अनावश्यक प्रवासाचा ताण कमी होणार असून, सुरक्षित, सोयीस्कर व खर्चिक भार कमी करणारा दिलासादायक निर्णय ठरला आहे, असे शिक्षक सेनेचे सुनील जाधव म्हणाले.