Sambhajinagar News : शहरात नव्या योजनेतून तब्बल २.३७ लाख नळ कनेक्शन देणार

महापालिकेकडून नियोजन सुरू, सर्वाधिक नो नेटवर्क भागातील वसाहती
chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Chhatrapati Sambhajinagar Muncipal corporation : मनपा कर्मचाऱ्यांना 3500 रुपये दिवाळी भेटPudhari News Network
Published on
Updated on

A total of 2.37 lakh tap connections will be provided in the city under the new scheme

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा: शहरवासियांना दररोज मुबलक पाणीपुरवठा व्हावा, यासाठी २७४० कोटी रुपये खर्चुन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. हे काम सध्या अंतिम टप्प्यात असून आता जेजे जलकुंभकार्यान्वीत केले जात आहेत, त्यावरील भागांना नळ कनेक्शन दिले जात आहेत. महापालिकेने शहरात २ लाख ३७ हजार नळ कनेक्शन देण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहेत. त्यात ९० हजार कनेक्शन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत तर उर्वरीत १ लाख ४२ हजार कनेक्शन महापालिका देणार आहेत. यामध्ये बहुतांश कनेक्शन हे नो नेटवर्क भागांतील वसाहतीत दिले जाणार आहेत.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Vikhe-Patil : मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात उच्चाधिकार समिती

महापालिकेकडे उपलब्ध असलेल्या रेकॉर्ड नूसार सध्या शहरात १ लाख ३५ हजार नळ कनेक्शन आहेत. त्यातील सुमारे १५ ते २० हजार कनेक्शन हे व्यवसायिक आहेत. मात्र, असे असले तरी शहराच्या विविध वसाहतींमध्ये यापेक्षा अधिक कनेक्शन असून ते अनधिकृत आहेत. हे सर्व कनेक्शन आता महापालिका अधिकृत करुन संबंधितांना दंड आकारून जोडण्या पूर्ववत करणार आहे. मागील काही महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू आहे. नव्या योजनेतून शहरात एमजेपीद्वारे ९० हजार कनेक्शन दिले जाणार आहेत. त्याबाबत एमजेपी व कंत्राटदार एजन्सीवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंत ४५ हजार कनेक्शन देण्यात आले आहेत.

दरम्यान, उर्वरित १ लाख ४२ हजार कनेक्शन महापालिका पाणीपुरवठा विभागाकडून दिले जाणार आहेत. यात देखील बहुतांश कनेक्शन हे आतापर्यंत ज्या भागात पाईपलाईन टाकण्यात आली नव्हती. त्या नो नेटवर्क भागातील वसाहतींत दिले जाणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. मात्र, यासाठी अगोदर त्या वसाहतीमध्ये जलकुंभासह नव्याने टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या कार्यान्वीत होणे आवश्यक आहे. त्याबाबत महापालिकेने एमजेपी आणि कंत्राटदार जीव्हीपीआर कंपनीहा सूचनाही दिली आहे.

chhatrapati sambhajinagar municipal corporation / छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका
Sambhajinagar News : महापौरांना घ्यावा लागतोय चक्क एमआयएमचा आधार

७०० कि.मी. पाईपलाईनेच काम शिल्लक

शहरात तब्बल १९०० किलो मीटर अंतरात अंतर्गत जलवाहिन्या टाकण्यात येत आहेत. त्यापैकी आतापर्यंत १२०० किलो मीटरच्या जलवाहिन्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरीत ७०० किलो मीटर लांबीच्या जलवाहिन्या टाकणे शिल्लक आहे. यात बहुतांश काम हे नो नेटवर्क भागातील आहे.

५३ पैकी ८ जलकुंभ कार्यान्वित

नव्या योजनेच्या कामात शहरात ५३ नवे जलकुंभ बांधून दिले जाणार आहे. यापैकी आतापर्यंत ८ जलकुंभ पूर्ण होऊन एमजेपी व कंत्राटदार जीव्हीपीआरने महापालिकेच्या ताब्यात दिले आहेत. लवकरच आणखी ६ जलकुंभ मिळणार आहेत. त्यातील २ जलकुंभामध्ये पाणी घेण्याची तयारी सुरू असून सातारा-देवळाईतील चार जलकुंभातही पाणी घेतले जाणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news