sambhajinagar news
दौलताबाद घाटात टेम्पो उलटला; १२ जण जखमीfile photo

दौलताबाद घाटात टेम्पो उलटला; १२ जण जखमी

कंदुरीसाठी म्हैसमाळला जात असताना दौलताबाद घाटात टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून अपघात.
Published on

A tempo overturned in the Daulatabad ghat; 12 people were injured

दौलताबाद, पुढारी वृत्तसेवा :

कंदुरीसाठी म्हैसमाळला जात असताना दौलताबाद घाटात टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या अपघातात बाराजण जखमी झाले. ही घटना शनिवारी दुपारी घडली.

sambhajinagar news
Fake notes : बँकेच्या सीडीएममध्ये १२ हजारांच्या बनावट नोटा

म्हैसमाळ यात्रेनिमित्त तंदूरचा कार्यक्रम असल्यामुळे तुर्काबाद खराडी येथील मोरे कुटुंबीय व त्यांची नातेवाईक टेम्पो क्र. एम एच १४ ए एच २३९१ ने दौलताबाद मार्गे म्हैसमाळकडे जात जात असताना दौलताबाद घाटातील मोठ्या वळणावर टेम्पोचे चालकाचे नियंत्रण सुटल्याने टेम्पो वळणावर पलटी झाला.

sambhajinagar news
निष्ठावंतांना डावलल्याने शिवसेनेत असंतोषाचा स्फोट

दौलताबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठविले. संजय तगुलाल माळी, जयश्री संजय माळी, श्रेया संजय माळी, सृष्टी संजय माळी, मीना राजेंद्र बर्डे, सुमन एकनाथ मोरे, मयूर अजय साळुंखे, नासिर मुन्ना पठाण, तेजा संजय माळी, विष्णू लक्ष्मण पवार, राधा विष्णू पवार, अमोल एकनाथ मोरे अशी जखमींची नावे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news