Fake notes : बँकेच्या सीडीएममध्ये १२ हजारांच्या बनावट नोटा

बँकेच्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन) मध्ये १२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्याने आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
fake currency
Fake Notes Case File Photo
Published on
Updated on

Fake notes of Rs 12,000 found in bank's CDM

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा :

बँकेच्या सीडीएम (कॅश डिपॉझिट मशिन) मध्ये १२ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्याने आर्थिक व्यवहारांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हा प्रकार २९ जा-नेवारी रोजी गारखेडा परिसरात असलेल्या आयडीएफसी फर्स्ट बँकेच्या मशीनमध्ये उघडकीस आला. या प्रकरणी पुडंलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

fake currency
शिवसृष्टीतील भित्तिचित्रांना आता काचेचे संरक्षण

गारखेडा परिसरातील गजानन महाराज मंदिर रोडवरील आयडीएफसी फर्स्ट बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून कार्यरत असलेले नीलेश महेश शिंधीकर (४०) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, २९ जानेवारी रोजी सकाळी कॅशियर समाधान ठोंबरे यांनी सीडीएम मशिनमधील कॅश तपासणीदरम्यान ५०० रुपयांच्या नऊ नोटा बनावट असल्याचे निदर्शनास आणून दिले.

fake currency
मनपा एमजेपीला देणार आणखी ८९ कोटी

बँकेच्या अंतर्गत नियमांनुसार एटीएम विभागाकडून संबंधित व्यवहाराची तपासणी करण्यात आली. तपासात सीडीएम मशिनमध्ये २७ जानेवारी रोजी रात्री ७.५८ वाजेच्या सुमारास कलीम खान याच्या खात्यात १२ हजार रुपये जमा करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news