मंदिरासह दुकान वाईन शॉप फोडून लाखोंचा ऐवज लंपास

शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या भागांत घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे.
Sambhajinagar Theft
मंदिरासह दुकान वाईन शॉप फोडून लाखोंचा ऐवज लंपास(Pudhari File Photo)
Published on
Updated on

A temple, a shop, and a wine shop were broken into, and valuables worth lakhs of rupees were stolen

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून, वेगवेगळ्या भागांत घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे. गेल्या तीन दिवसांत चोरट्यांनी चेलीपुरा येथील डेली नीड्स, कामगार चौकातील वाईन शॉप आणि मुकुंदनगरातील एका मंदिराला लक्ष्य केले. या तिन्ही घटनांमध्ये चोरट्यांनी ७ लाख ९ हजार रुपयांची रोकड लंपास केली असून, यामुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Sambhajinagar Theft
Climate Change : थंडी गायब, कमाल, किमान तापमानात वाढ

मुकुंदनगरात मंदिरातील दानपेटी चोरीला मुकुंदनगर भागातील महादेव मंदिराच्या दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी चोरीला गेल्याचे समोर आले आहे. ही घटना रविवारी (दि. २५) सकाळी साडेपाचच्या सुमारास रेल्वे गेट क्र. ५६ भागात उघडकीस आली. फिर्यादी कैलास बापूराव मेंडके (५०, रा. मुकुंदनगर) यांच्यासह स्थानिकांनी वर्षभरापूर्वी महादेव मंदिराची स्थापना केली होती. दानपेटीमध्ये अंदाजे पाच ते सहा हजार रुपये होते, असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाईन शॉप फोडून ६ लाखांची रोकड लंपास वाईन शॉप फोडून चोरट्याने तब्बल ६ लाखांची रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. २३) मध्यरात्री कामगार चौक, सिडको एन-२ भागात घडली. अशोक शिवनारायण जैस्वाल यांचे कामगार चौकात वाईन शॉप आहे. शॉपवर फिर्यादी वाल्मीक किसनराव नागरे (४६, रा. विश्रांतीनगर) हे मॅनेजर म्हणून काम करतात.

Sambhajinagar Theft
Silver Price : चार दिवसांत चांदी तब्बल २७ हजारांनी वधारली

नेहमीप्रमाणे २३ जानेवारीला रात्री ते दुकान बंद करून घरी गेले. मध्यरात्री चोरट्याने चॅनल गेट आणि शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गल्ल्यातील व तिजोरीतील ५ लाख ९३ हजार आणि १५ हजार चिल्लर अशी रोकड लंपास केली. याप्रकरणी रविवारी (दि. २५) मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेलीपुऱ्यात दुकान फोडून लाख रुपये लंपास

दुकानचे कुलूप तोडून चोरट्याने १ लाख १० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना शनिवारी (दि. २४) मध्यरात्री चेलीपुरा येथील फॅमिली ट्रीट डेली नीड्स या दुकानात घडली. फिर्यादी काझी निसरूद्दीन फारोकी काझी नासिरूद्दीन फारोकी (४४, रा. जिन्सी) यांच्या तक्रारीवरून सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news