Silver Price : चार दिवसांत चांदी तब्बल २७ हजारांनी वधारली

सोने दरातही घसघशीत साडेचार हजार रुपयांची वाढ
Silver Price Today
सोने दरातही घसघशीत साडेचार हजार रुपयांची वाढPudhari
Published on
Updated on

In four days, the price of silver increased by a staggering 27,000

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त सेवा: सोने दरात सातत्याने वाढ सुरूच असून, मागील चार दिवसांत सोने प्रतितोळा तब्बल ४ हजार ५०० रुपयांनी महागले आहे. तर चांदीची चकाकी तब्बल २७ हजारांनी महागली आहे. त्यामुळे शहरातील सराफा बाजारात एक तोळा सोने १ लाख ६४ हजार रुपये, तर चांदी प्रतिकिलो ३ लाख ६२ हजारांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचल्याचे जिल्हा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले.

Silver Price Today
मनपा प्रियदर्शनी शाळेत हिंद दी चादर उपक्रमाचे प्रेरणादायी व्याख्यान

जागतिक स्तरावरील घडामोडी आणि सुरक्षित गुंतवणुकीसाठी मागणीत सातत्याने होणारी वाढ यामुळे सोने-चांदीच्या किमती दिवसेंदिवस वाढतच आहेत. गतवर्षी २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅमचा भाव ६४ हजार १०० रुपये असा होता. या वर्षभरात सोने दरात तब्बल एक लाख रुपयांची वाढ झाली आहे. मागील चार दिवसांत प्रतितोळा साडेचार हजार रुपये वाढले आहेत.

Silver Price Today
Climate Change : थंडी गायब, कमाल, किमान तापमानात वाढ

त्यामुळे सोन्याचे दर १ लाख ५९ हजार ५०० रुपयांवरून १ लाख ६४ हजारांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. सोन्यापाठोपाठ चांदीचे दरही सातत्याने वाढत असून, या चार दिवसांत चांदीचे भाव तब्बल २७ हजार रुपयांनी वाढल्याने मंगळवारी शहरातील सराफा बाजारात चांदीची चकाकी ३ लाख ६२ हजारांपर्यंत वधारल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news