रेल्वे प्रवाशांचे दागिने लुटणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

३ लाखांचा ऐवज हस्तगत; पोलिसांची संयुक्त कारवाई
sambhajinagar crime news
रेल्वे प्रवाशांचे दागिने लुटणारा अट्टल चोरटा पोलिसांच्या जाळ्यातfile photo
Published on
Updated on

A persistent thief who robbed railway passengers of their jewellery is caught by the police

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा

नांदेडहून हडपसरकडे प्रवास करणाऱ्या ६८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण धावत्या नांदेड-पुणे एक्स्प्रेसमधून हिसकावणारया अट्टल गुन्हेगारास लोहमार्ग - स्थानिक गुन्हे शाखेने मालधक्का परिसरात बेड्या ठोकल्या. आर्यन हरी जाधव (३२, रा. राजनगर, रेल्वे स्टेशन परिसर) असे त्याचे नाव असून, त्याच्याकडून सुमारे ३ लाख - रुपयांचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले आहे.

sambhajinagar crime news
Sambhajinagar River Project : खाम, सुखना नदी प्रकल्पाची कामे पावसाआधी पूर्ण करा

वैजयंतीमाला सीतावार (६८, रा. पूर्णा रोड, वाडी) ३ मार्च रोजी कुटुंबासह नांदेडहून - हडपसरकडे प्रवास करत होत्या. नांदेड-पुणे - एक्स्प्रेसच्या एस-५ कोचमधून एका चोरट्याने खिडकीतून त्यांच्या गळ्यातील - सुमारे ४३ हजार ७०० रुपये किमतीचे सोन्याचे गंठण तोडून पळ काढला. या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या लोहमार्ग - पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मालधक्क्यांवर ठोकल्या बेड्या

गुन्ह्याचा तपास करताना लोहमार्ग पोलिस स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही - फुटेज आधारे आर्यन जाधव हा मालधक्का परिसरात असल्याचे समजले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आर्यनला बेड्या ठोकल्या.

sambhajinagar crime news
मूल्याधिष्ठित विद्यार्थी घडविण्यासाठी दशसूत्रीची आवश्यकता : जिल्हाधिकारी

चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे ३ लाख रुपये किमतीचे सोन्याचे गंठण जप्त करण्यात आले. ही कारवाई लोहमार्गाच्या अधीक्षक स्वाती भोर व उपअधीक्षक संजय लोहकरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक प्रशांत गंभीरराव, राहुल गायकवाड, प्रमोद जाधव, गजानन चिलकेवार, विक्की हरने तसेच आरपीएफ सीआयबीचे आरक्षक दयानंद सविता आदींनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news