Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानात येणार सिंहाची जोडी

प्राणिसंग्रहालय प्राधिकारणाची मंजुरी, अस्वल कोल्हाही मिळणार
Siddhartha Udyan News
Siddhartha Udyan : सिद्धार्थ उद्यानात येणार सिंहाची जोडीFile Photo
Published on
Updated on

A pair of lions will come to Siddhartha Udyan

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयामध्ये नव्याने सिंह, वाघ आणि चिता आणण्यावर बंदी घातली होती. मात्र, आता हे प्रतिबंध उठवण्यात आले आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानात कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयातून सिंहाची एक जोडी आणली जाणार आहे.

Siddhartha Udyan News
The new academic year beginning : उन्हाळी सुट्यांनंतर आज वाजणार शाळांची पहिली घंटा

तर येथून तीन वाघ त्यांना दिले जाणार आहे. या अदलाबदलाला केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच उद्यानात सिंहाची डरकाळी ऐकायला मिळणार आहे.

मराठवाड्यातील एकमेव असलेले सिद्धार्थ उद्यानाचे वातावरण हे वाांच्या जन्मासाठी पोषक ठरत आहे. या प्राणिसंग्रहालयालयात मागील काही वर्षांत वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयात वाघ आणि बिबट्या पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक व नागरिक प्राणी पाहण्यासाठी येतात.

Siddhartha Udyan News
Sambhajinagar Bribe case : लाच प्रकरणात जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला एसीबीने दिली नोटीस

या उद्यानात पूर्वी वाघासोबतच, सिंह, बिबट्या, अस्वल, हत्ती, मगर, हरण, काळवीट, सांबर, निलगाय, शहामृग, लांडगा, सायाळ, लाल माकड, असे सर्व प्राणी होते. त्यामुळे चिमुकले आकर्षित होत असे, मात्र, सिंह मरण पावल्यानंतर उद्यानाला नव्याने सिंहाची जोडीच मिळू शकली नाही. तसेच हत्तीची जोडीदेखील उद्यानातून जंगलात पाठवण्यात आली. परंतु आता २० वर्षांनतर उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाला सिंहाच्या जोडीसोबतच अस्वल आणि कोल्होबा देखील मिळणार आहे.

केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाने जी बंदी घातली होती. ती आता उठवली असून सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयाला लवकरच सिंह मिळणार आहे. पिंजऱ्यांचा आकार छोटा असल्याने केंद्रीय प्राधिकरणाने ही बंदी घातली होती. मात्र येत्या काही महिन्यांतच प्राणिसंग्रहालय सिद्धार्थ उद्यानातून मिटमिटा येथील १५० एकरमध्ये २५० कोटी रुपये खर्चुन उभारण्यात येत असलेल्या झुलॉजिकल पार्क म्हणजेच सफारी पार्क येथे स्थलांतरित होणार आहे. त्यामुळेच केंद्रीय प्राणिसंग्रालय प्राधिकरणाने ही परवानगी दिली आहे. या मंजुरीमुळे आता बच्चे कंपनीला जंगलाचा राजा सिंह उद्यानात पहायला मिळणार आहे.

२० वर्षांनंतर मिळणार सिंह

सिद्धार्थ उद्यानाच्या प्राणिसंग्रहालयामध्ये अगोदर सिंहाची जोडी होती. परंतु, यातील शेवटचा सिंह २००६ साली मरण पावला. तेव्हापासून सिद्धार्थ उद्यानात सिंह नाही. यापूर्वी अनेकवेळा सिंहाच्या जोडीसाठी उद्यानाकडून प्रयत्न केले गेले. मात्र, केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या बंदीमुळे मिळू शकले नाही. मात्र, वाघांसाठी पोषक वातावरण निर्माण झाल्याने व वाघांचा जन्मदर वाढल्याने उद्यानाला सिंहाची जोडी मिळाली असावी.

दोन्ही प्राणिसंग्रहालयांची मंजुरी

कर्नाटकातील शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाने मनपाच्या प्राणिसंग्रहालयाशी संपर्क साधून वाघ देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानाकडून शिवमोग्गा प्राणिसंग्रहालयाकडे सिंह, अस्वल, कोल्हे या प्राण्यांची मागणी करण्यात आली आहे. या प्राणिसंग्रहालयामध्ये सिंह, अस्वलाची संख्या जास्त आहे. त्यामुळे एक-एक जोडी देण्यास सहमती दर्शविली आहे. तर सिद्धार्थ उद्यानाकडून त्यांना ३ वाघ दिले जाणार आहेत. लवकरच प्राण्यांची अदलबदल केली जाणार असल्याचे उपायुक्त विजय पाटील यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news