Sambhajinagar News : छावणीत भीषण आग; पती-पत्नी जखमी

शहरात एकीकडे प्रजा-सत्ताक दिनाचा उत्साह असतानाच, पहाटेच्या सुमारास छावणी परिसरातील सुभाषपेठ भागात एका घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली.
sambhajinagar news
छावणीत भीषण आग; पती-पत्नी जखमीFile Photo
Published on
Updated on

A massive fire broke out in the camp; a husband and wife were injured

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरात एकीकडे प्रजा-सत्ताक दिनाचा उत्साह असतानाच, पहाटेच्या सुमारास छावणी परिसरातील सुभाषपेठ भागात एका घराला भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. या आगीत पती-पत्नी दोघेही भाजले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. अग्निशमन दलाने दाखवलेल्या तत्परतेमुळे ही आग शेजारील घरांपर्यंत पसरली नाही आणि मोठा अनर्थ टळला.

sambhajinagar news
Ajit Pawar plane crash | 'दादा' गेले..., पण पहाटेचा 'तो' दणका बीडकर कधीच विसरणार नाहीत

अधिक माहितीनुसार, सोमवारी (दि.२६) पहाटे ३:१४ वाजेच्या सुमारास छावणीतील गल्ली क्रमांक २, सुभाषपेठ येथील गणेश मंदिर राजवळ राहणाऱ्या राजेश दुबे यांच्या घराला अचानक आग लागली. गाढ झोपेत असताना लागलेल्या या आगीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. महावितरणचे कर्मचारी सर्जेराव यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तातडीने अग्निशमन केंद्राला माहिती दिली.

पदमपुरा अग्निशमन केंद्राचे पथक बंबासह काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. जवानांनी जिवाची बाजी लावून आगीवर पाण्याचा मारा केला. घराच्या चहुबाजूंनी दाट वस्ती असल्याने आग पसरण्याची भीती होती, मात्र पथकाने ती मर्यादित ठेवत आगीवर नियंत्रण मिळवले.

sambhajinagar news
Bank Employees Strike : बँक कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ६०० कोटींचे व्यवहार ठप्प

शॉर्टसर्किटचा अंदाज

या आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने अशोक दुबे (४५) आणि रीना दुबे (४५) हे दोघे गंभीररीत्या भाजले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news