

A grand procession of the mayor and councilors in a jeep
फुलंब्री, पुढारी वृत्तसेवा येथील नवनिर्वाचित नगराध्यक्ष राजेंद्र ठोंबरे यांनी पदाचा पदभार स्वीकारला आहे. येथील मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ठोंबरे यांनी ठोंबरे यांचे स्वागत करून पदभार दिला.
राजेंद्र ठोंबरे व सर्व नगरसेवक यांनी येथील आराध्य दैवत संस्थान गणपती मंदिरात विधिवत अभिषेक केला. त्यानंतर अध्यक्ष व सर्व नगर-सेवक यांची उघड्या जीपमधून मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या मार्गांवर महिलांनी सडा रांगोळी काढून ठोंबरे यांचे औक्षण केले. ही मिरवणूक जि.प शाळा प्रांगणात कार्यक्रम स्थळी आली.
तेथे नागरी सत्कार होऊन या निवडणुकीत ज्यांनी परिश्रम घेतले. अशा व्यक्तींचे स्वतः ठोंबरे यांनी स्वागत केले. व्यासपीठावर अध्यक्ष, नगरसेवक तसेच मान्यवर उपस्थित होते. हा पदग्रहण सोहळा दिमाखदार झाला. या कार्यक्रमास चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे व खा. कल्याण काळे यांची अनुपस्थिती होती. यामुळे या कार्यक्रमात हा चर्चेचा विषय होता. कार्यक्रमात सर्वांची भाषणे झाल्यानंतर ठोंबरे व नगरसेवक हे नगरपंचायतमध्ये आले. तेथे पंचायत प्रशासनातर्फे सर्वांचे स्वागत झाले.
दोन दिवसांपासून नगरपंचायत इमारतीस चोहोबाजूने लाईटिंग केलेली होती व समोरील पुतळे स्वच्छ करण्यात आले. इमारतीतील सर्व दालनांची फुलांनी सजावट केलेली होती. बृह्मवृंदाच्या मंत्रोउपचाराने खुर्ची व दालनाची विधिवत पूजा केल्या नंतर ठोंबरे खुर्चीवर स्थानापन्न झाले.
सूत्रसंचलन नरेंद्र सिमंत यांनी केले, यावेळी संतोष मेटे, संदीप बोरसे अशपाफ पटेल, मंगेश मेटे, असगर पटेल, सुदाम मते, राजेंद्र काळे, अरुणसेठ वायकोस, बापूराव म्हस्के, अंकुश ताठे, मुनतिजीब काझी, उमेश दुतोंडे, पवन घोडके, राजू प्रधान, विष्णू वानखेडे, श्रीराम म्हस्के यांच्यासह आदींची उपस्थिती होती.