Bibi ka Maqbara : मकबऱ्यातील भिंतीची डागडुजी सुरू

ऐतिहासिक बीबीका मकबऱ्यात प्रवेश करताच मकबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरी प्राचिन छोटी भिंत (पडदी) अनेक महिन्यांपासून मोडकळीस आली होती.
Bibi ka Maqbara
Bibi ka Maqbara : मकबऱ्यातील भिंतीची डागडुजी सुरूFile Photo
Published on
Updated on

Bibi ka Maqbara: Repair work is underway on the walls of the mausoleum

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक बीबीका मकबऱ्यात प्रवेश करताच मकबऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरी प्राचिन छोटी भिंत (पडदी) अनेक महिन्यांपासून मोडकळीस आली होती. तिच्या दुरुस्तीची मंजुरी मिळताच सोमवार (दि.२९) पासून ही भिंत बांधण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ही भिंत मकबऱ्या सोबतच बांधलेली असल्याची माहिती पुरातत्व विभागाच्या वतीने देण्यात आली.

Bibi ka Maqbara
Ghati Hospital News : घाटीत तीन महिने व्हेंटिलेटरवर यशस्वी उपचाराने महिला ठणठणीत

मकबर्यात प्रवेश करताच डाव्या बाजूने असलेली पडदी अनेक महिन्यांपासून मोडकळीस आली होती. तिच्यासाठी गार्डनच्या बाजूने लोखंडी टेकू लावून तिला सुरक्षित करण्यात आले होते. या भिंतीच्या दुरुस्तीसाठी पुरातत्व विभागाने प्रस्ताव पाठवला होता. भिंतीच्या दुरुस्तीला नुकतीच मंजुरी मिळाली.

मंजुरी मिळताच सोमवारपासून दुरुस्तीच्या कामाला दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांत नार- ाजीचा सूर उमटला आहे. सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान पुरातत्त्व विभागाच्या दुर्लक्षांमुळे मकबर्यातील अनेक भाग खिळखिळे झाले आहेत. मीनार काळवंडले आहेत. तरीही या ऐतिहासिक वास्तुकडे दुर्लक्ष होत असल्याने पर्यटकांत नार- ाजीचा सूर उमटला आहे.

Bibi ka Maqbara
गोऱ्या पोरींच्या नाशिबीही काळपट नवरे

वर्षभरापासून टेकू

ही भिंत वर्षभरापूर्वी झुकली होती. अपघात होण्याची शक्यता असल्याने पुरातत्व विभागाने या भिंतीला लोंखंडी रॉडचा टेकू देऊन ठेवला होता. त्या परिसरात जाण्यासाठी पर्यटकांना बंदीही घातली होती. सुमारे वर्षभर या परिसरात पर्यटकांना बंदी असल्याने अनेकांनी हे काम लवकर करण्याची मागणी केली होती. परंतु प्रतिसाद मिळत नसल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news