Sillod News : विविध कामांचे सव्वा आठ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावर

सभापती अनिता बनकर यांची माहिती, उर्वरित निधीसाठी पाठपुरावा
sillod news
Sillod News : विविध कामांचे सव्वा आठ कोटी लाभार्थ्यांच्या खात्यावरfile photo
Published on
Updated on

8.25 Crore Rupees for Various Schemes Deposited into Beneficiaries' Accounts

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत विविध कामांचे ८ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी ६६३ लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती पंचायत समितीच्या सभापती अनिता सुरेश बनकर यांनी दिली. तर उर्वरित - निधीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

sillod news
PM Awas Yojana : घरकुलांच्या पूर्णत्वास निधीचा ब्रेक; तिसऱ्या हप्त्यात अडथळा

तालुक्यात महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत वृक्ष लागवड, गाय गोठा, शेळी शेड, वैयक्तिक सिंचन विहीर अशा एकूण ६६३ लाभार्थ्यांचे थकीत ८ कोटी ३३ लाख रुपयांचा निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होते आहे. त्याच प्रमाणे १ हजार ३१९ घरकुलांचे जवळपास ४ कोटी ६१ लाखांचा मंजूर निधीही लाभार्थ्यांच्या खात्यावर प्राप्त झाला आहे.

सन २०२४- २५ मधील पूर्ण झालेल्या घरकुल लाभार्थ्यांना वाढीव ५९ हजार रुपयांचे अनुदान शासनाने मंजूर केलेले आहे. त्यापैकी प्रत्येकी ३५ हजार रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली असून उर्वरित १५ हजार रुपये सौरऊर्जा (सोलर) बसवल्यानंतर लाभार्थ्यांना अदा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. वैयक्तिक सिंचन विहीर, गाय गोठे, वृक्ष लागवड, शेळी पालन अशा विविध योजनेचे उर्वरित थकीत निधीसाठी शासन दरबारी पाठपुरावा सुरू आहे. हा निधीही लवकर प्राप्त होईल, अशी माहिती अनिता बनकर यांनी दिली.

sillod news
Ladki Bahin : लाडक्या बहिणींची अंगणवाडीताई करणार पडताळणी
पंचायत समिती अंतर्गतच्या विविध योजना तळागाळातल्या जनसामान्यांसाठी आहे. त्यात अधिकारी, कर्मचाऱ्यांनी लाभार्थ्यांची अडवणूक करू नये. असा प्रकार समोर आल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल. कुठल्याही कामात अडवणूक केल्यास लाभार्थ्यांनी माझ्याशी संपर्क साधावा.
- अनिता बनकर, सभापती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news