Sambhajinagar News : जिल्ह्यात ७७ शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापकपद

समुपदेशनातून शाळांची निवड; गंगापूर, खुलताबादला शिक्षकांची पसंती कमी
Sambhajinagar News
Sambhajinagar News : जिल्ह्यात ७७ शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापकपदfile photo
Published on: 
Updated on: 

77 teachers promoted to principal's post in the district

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक पदवीधर आणि सहशिक्षक संवर्गातील ७७ शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापकपदी नियुक्ती देण्याची प्रक्रिया शनिवारी (दि. १९) पार पडली. वेरूळ सभागृहात झालेल्या समुपदेशन फेरीत शिक्षकांकडून पसंतीच्या शाळांची नोंद करून घेण्यात आली.

Sambhajinagar News
Artificial Immersion Tanks : मनपाच्या कृत्रिम विसर्जन तलावांत पाण्याची कमतरता

पसंतीनुसार नियुक्तीपत्रे देण्यात आली असून, सोमवारी संबंधित शिक्षक नव्या शाळांमध्ये मुख्याध्यापक म्हणून रुजू होणार आहेत. अध्यक्ष अविनाश गलांडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्या उपस्थितीत न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून ही प्रक्रिया राबविण्यात आली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र घोरपडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संघरत्न सरोदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, पदोन्नती प्रक्रियेत सेवाज्येष्ठ शिक्षकांना डावलण्यात येत असल्याचा आक्षेप शिक्षक समन्वय समितीने घेतला होता. ऑगस्ट २०२४ नंतर टीईटी, सीटीईटी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांनाही सेवाज्येष्ठतेनुसार संधी देऊन सुधारित यादी जाहीर करावी, अशी समितीची मागणी होती. यासाठी समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हा परिषद प्रशासनाकडे निवेदनही दिले होते.

गंगापूर-खुलताबादला पसंती कमी

प्रत्येक तालुक्यात पदोन्नतीसाठी जागांचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यांत मुख्याध्यापक म्हणून जाण्यास शिक्षकांनी तुलनेने कमी पसंती दर्शविल्याची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यांतील काही जागा रिक्त राहिल्याचे सूत्रांनी सांगितले.

Sambhajinagar News
Ganeshotsav 2026 : नवनाथांसह प्रेम महलाचे आकर्षण; गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

काही शिक्षक अवलंबणार न्यायालयाचा मार्ग

जिल्ह्यात मुख्याध्यापकांची २५० पेक्षा अधिक पदे रिक्त असल्याने सर्व पात्र शिक्षकांचा समावेश करून सुधारित सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करावी, अशी मागणी आहे. प्रशासनाने घाईने प्रक्रिया केल्याचा आरोप समन्वय समितीचे महेंद्र बारवाल यांनी केला असून, काही शिक्षक न्यायालयात दाद मागण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news