Ganeshotsav 2026 : नवनाथांसह प्रेम महलाचे आकर्षण; गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापना करून विविध देखावे तयार केले आहेत.
sambhajinagar news
नवनाथांसह प्रेम महलाचे आकर्षण; गणेश मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दीfile photo
Published on
Updated on

Charm of Prem Mahal with Navnath; Devotees flock to see the scenes of Ganesh Mandal

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शहरातील गणेश मंडळांनी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात बाप्पांची प्रतिष्ठापना करून विविध देखावे तयार केले आहेत. गणेश मंडळानी केलेल्या विद्युत रोषणाईसह सामाजिक प्रबोधन पर तांत्रिक स्वयंचलित देखावा, नवनाथांसह प्रेम महल आणि खंडोबा बानू विवाह, पौराणिक सजीव देखावे भक्तांना आकर्षित करत आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने शहरातील विविध भागातील गणेश मंडळांनी साकारलेले देखावे पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र होते.

sambhajinagar news
Women Farmers' Portal : शेतमजूर, महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख

दरवर्षी गणेशोत्सवानिमित्ताने शहराच्या मध्यवर्ती भागातील संभाजीपेठ, गुलमंडी, नागेश्वरवाडी, खडकेश्वर, शहागंज, केळीबाजार, जाधवमंडी, सराफा रोड, राजाबाजार या ठिकाणी गणेश मंडळांकडून साकारण्यात आलेले सजीव, निर्जीव देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असते. यंदाही गणेशोत्सवानिमित्त शहरात सध्या भक्तीपूर्ण आणि उत्साहाचे वातावरण असून, या निमित्ताने शहरातील विविध गणेश मंडळांनी मोठ्या मेहनतीने सजीव, निर्जीव देखावे तयार केले आहेत.

काही मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. काही मंडळांनी शहराबाहेरील कारागीर आणून भव्य देखावा तयार केला आहे. हे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी होत आहे. यात ४१५ वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरातील जबाबदार नागरिक म्हणून आपली शहरा प्रती कोणती जबाबदारी आहे याविषयी सामाजिक प्रबोधन पर तांत्रिक स्वयंचलित देखावा न्यू शिवशक्त्ती गणेश मित्र मंडळाने खडकेश्वर येथील मैदानावर उभारला आहे.

sambhajinagar news
Sambhajinagar News : दुरुस्तीसाठी दिलेल्या सोन्याच्या बांगडीसह दुकानदार पसार

यासोबतच रंगारगल्ली येथील वीर बलराम गणेश मंडळाने साकारलेला जगन्नाथ पुरीचा देखावा सर्वांचे आकर्षण ठरत आहे. शिवकल्याण राजे गणेश मंडळाने साकारलेला नवनाथांचा देखावा आणि नागेश्वरवाडी येथील महाकाल गणेश मंडळाचा प्रेम महल देखावा बघण्यासाठी अलोट गर्दी उसळत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news