छत्रपती संभाजीनगर : पैशासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : पैशासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल

सिल्‍लोड ; पुढारी वृत्‍तसेवा पैशांसाठी विवाहित महिलेकडे वारंवार तगादा लावणाऱ्या सासरच्या ५ लोकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गाडी घेण्यासाठी माहेरहून अडीच लाख रुपये घेवून ये अशी मागणी सातत्याने विवाहितकडे होत होती. त्‍यातच या विवाहितेला सतत अश्लील शिविगाळ करून मारहाण करणे. शारीरिक व मानसिक छळ करून त्रास दिला जात होता. अन्याय इतक्यावर थांबले नाहीत तर अंगावरील दागिने काढून घेऊन संबंधित विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्यात आले होते. पतीसह सासरच्या लोकांकडून होणारा मानसिक व शारीरिक त्रास असह्य झाल्याने अखेर विवाहितेने आपल्‍या यावल तालुक्यातील नायगाव येथील सासरच्या पाच लोकांविरुद्ध सिल्लोड ग्रामीण पोलिस स्‍टेशनमध्ये १ मार्च रोजी गुन्हा दाखल केला.

सिल्लोड ग्रामीण पोलीस स्टेशमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हंटले आहे की, मला एका वर्षांपासून सारची मंडळी वरील कारणामुळे त्रास देत आहेत. माझ्या वडिलांनी सासरच्या लोकांची पैशाची मागणी पूर्ण न केल्याने मला जास्त त्रास सुरू झाला. या त्रासाला कंटाळून मी ही तक्रार देत असल्याचे महिलेने म्‍हटले आहे.

त्यावरून पोलिसांनी संशयीत आरोपी पीडितेचा पती आशिक दिलीप तडवी, सासरा दिलीप गब्बु तडवी, सासु हिरा दिलीप तडवी, पतीचा मोठा भाऊ जेठ आरेफ दिलीप तडवी, दिराची पत्नी जेठाणी रिंकु आरेफ तडवी सर्व रा.नायगाव ता.यावल जि.जळगाव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.दिनेश कोल्हे यांच्या मार्गदर्शनात सपोनी विजयसिंह राजपूत यांच्या नियंत्रणात सुरू आहे.

हेही वाचा :

Back to top button