छ.संभाजीनगर : सिद्धेश्वर साखर कारखाना निवडणूक; २१ जागांपैकी ६ जागा बिनविरोध

छ.संभाजीनगर : सिद्धेश्वर साखर कारखाना निवडणूक; २१ जागांपैकी ६ जागा बिनविरोध

सिल्लोड: पुढारी वृत्तसेवा : सिल्लोड तालुक्यासह भोकरदन व फुलंब्री तालुका कार्यक्षेत्र असलेल्या माणिकनगर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी २१ जागांसाठी ६६ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. छाननीमध्ये ३७ जणांचे उमेदवारी अर्ज वैध ठरले. तर २९ जणांचे उमेदवारी अर्ज विविध कारणांनी अवैध ठरले आहेत. छाननीत घाटनांद्रा व भोकरदन या दोन गटातील ६ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. Siddheshwar Sugar Factory Election

भोकरदन व घाटनांद्रा या दोन गटातून ६ संचालक बिनविरोध निवडून आले आहेत. उर्वरित सिल्लोड गट जागा ३ उमेदवार ५, शिवणा गट जागा ३ उमेदवार ४ व निधोना गट जागा ३ उमेदवार ४ या ऊस उत्पादक ५ गटातून १५ संचालक निवडले जाणार आहेत. Siddheshwar Sugar Factory Election

दोन गटातील ६ बिनविरोध निवडून आल्याने आता उर्वरित ०३ गट मतदासंघातून ०९ संचालक तसेच महिला मतदारसंघ २ जागा उमेदवार ५, अनुसूचित जाती – जमाती जागा १ उमेदवार ३, इतर मागासवर्ग जागा १ उमेदवार ३, विमुक्त जाती भटक्या जमाती – विशेष मागासवर्ग जागा १ उमेदवार ४ या प्रमाणे २० संचालकांची निवड १२०९ ऊस उत्पादक सभासद मतदार करतील.

एका संचालकांची निवड उत्पादक सहकारी संस्था – बिगर ऊस उत्पादक संस्था – पणन संस्था या मतदारसंघातील ८४ मतदार करतील. या एका जागेसाठी ३ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहे. याप्रमाणे २१ संचालकांची निवड मतदानातून केली जाणार आहे.

दि. ६ मार्चपर्यंत उमेदवारी मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दि. ७ मार्चरोजी निवडणूक चिन्ह वाटप होणार आहे, दि.१७ मार्चला मतदान होणार असून दि.१८ मार्च रोजी मतमोजणी होईल. ही सर्व निवडणूक प्रक्रिया निवडणूक निर्वाचन अधिकारी एस.पी.काकडे, सहायक निवडणूक अधिकारी रोडगे, अशोक जाधव, सुधाकर गायके यांच्या नियंत्रणाखाली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान माणिकनगर, भवन कार्यालयात होणार आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व राज्याचे अल्पसंख्याक पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची मैत्री पाहता कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news