Maratha reservation : पैठण येथे मराठा आरक्षण अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको

Maratha reservation : पैठण येथे मराठा आरक्षण अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी रास्ता रोको

Published on

पैठण, पुढारी वृत्तसेवा : अखंड मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मागणीसाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने पैठण शहरातील सह्याद्री चौकात गुरुवारी सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर मराठा समाज बांधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडवणीस यांच्याविरुद्ध आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रास्ता रोको आंदोलनामुळे छत्रपती संभाजीनगर, शेवगाव, अहमदनगरकडे जाणाऱ्या सर्व वाहतूक थांबविण्यात आली होती. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचीत प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचे कायद्यात रूपांतर करावे, अशी मागणी करण्यात आली.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news