वडीगोद्री; पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षण आंदोलन नेते मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा आज गुरुवारी सहावा दिवस असून त्यांची प्रकृती आणखी खालावली आहे. "पाटील पाणी तरी घ्या…" अशी आर्त विनवणी आंदोलनक जरांगे यांना करत आहेत. मात्र जरांगे सकाळपासून उठलेले नाहीत.
बुधवारी सकाळी जरांगे यांच्या नाकातून रक्तस्राव झाल्याची बातमी वा-यासारखी पसरल्यानंतर अंतरवालीकडे समाजबांधवांचा ओघ वाढला आहे. नारायणगडचे महंत शिवाजी महाराज यांच्या आदेशावरून त्यांना सलाईन लावले होते. परंतू ते त्यांनी काढून टाकले. सरकारी किंवा खासगी उपचारास नकार दिला. उपोषणस्थळी आसणा-या कार्यकर्तांचा अश्रुचा बांध फुटत चालला असून जरांगे यांनी पाणी तरी घ्यावे, असा आग्रह समाजबांधव करीत आहेत. उपोषणस्थळी रात्री किर्तन, भजनाचे कार्यक्रम होत आहेत.
जरांगे पाटील यांच्या लढ्याला यश येवो याकरिता श्रीक्षेत्र तुळजापूर येथून तुळजाभवानी देवीची ज्योत घेवून काही समाज बांधव अंतरवालीत आले. जरांगे यांची नियमित आरोग्य तपासणी करण्यासाठी आज सकाळी १० वाजता आरोग्यपथक आले, मात्र तपासणी करून देण्यास त्यांनी नकार दिला. "उपचार घेवू नका, तपासणी तरी करू द्या," अशी विनंती आरोग्य पथकातील डॉक्टरांनी त्यांना केली मात्र त्यांनी त्यालाही विरोध केला.
दरम्यान, जरांगे यांनी किमान पाणी तरी घ्यावे, अशी खूप वेळ विनंती तेथे उपस्थित पत्रकारांनी बुधवारी रात्री केली. पुढारीचे वाडीगोद्री येथील वार्ताहर सुरेश काळे यांनी त्यांना पाणी दिले. त्यानंतर त्यांनी दोन घोट पाणी पिले.
हेही वाचा :