छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडला विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे रास्ता रोको आंदोलन | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : सिल्लोडला विविध मागण्यांसाठी कोळी समाजाचे रास्ता रोको आंदोलन

सिल्लोड, पुढारी वृत्तसेवा : सोयगाव तालुक्यातील फर्दापूर येथील पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्या प्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक भरत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा. तसेच या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी. कोळी समाजाला जात प्रमाणपत्र देण्यात यावे, या प्रमुख मागण्यांसाठी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात कोळी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

यावेळी छत्रपती संभाजीनगर – जळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आंदोलन ठिकाणी शहर पोलिस व महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button