छत्रपती संभाजीनगर : गॅस कटरने एटीएम फोडून १६ लाख लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला स्‍प्रे | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : गॅस कटरने एटीएम फोडून १६ लाख लंपास; सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर मारला स्‍प्रे

छत्रपती संभाजीनगर : पुढारी वृत्‍तसेवा गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम फोडून चोरट्यांनी तब्‍बल 16 लाख रुपये लंपास केले. ही घटना बुधवारी पहाटे घडली. शहरातील स्टेशन रोडवरील आयडीबीआय बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडले. चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी सुरुवातीला सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारला. शिवाय तेथील वीजपुरवठा खंडीत केला होता.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर वैजापूर व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्‍थळी धाव घेतली. विशेष म्हणजे या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली नाही.

हेही वाचा : 

Back to top button