सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !

आठ आयएएस अधिकाऱ्यांकडून अचल संपत्ती जाहीर; श्रीकांत, अंकित, जीवणे यांची पाटी कोरी
सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !
सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !file photo
Published on
Updated on

Eight IAS Officers Declare Immovable Assets

सुनील कच्छवे

छत्रपती संभाजीनगर : महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे सीईओ अंकित आणि महावितरणचे सह व्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवणे यांनी आपल्याकडे एक पैशाचीही अचल संपत्ती नसल्याचे ताज्या विवरणपत्रात नमूद केले आहे. तर उर्वरित पाच अधिकाऱ्यांमध्ये सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनियार हे सर्वात श्रीमंत अधिकारी असल्याचे समोर आले आहे. मिनियार यांच्याकडे एकूण ११ कोटी रुपयांची अचल संपत्ती आहे. इतर अधिकाऱ्यांच्या नावावरही निवासी घरे, फ्लॅट, खुले भूखंड आणि शेतीजमीन अशी संपत्ती आहे.

सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !
Municipal Election | देवाभाऊंचाच करिष्मा!

भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकाऱ्यांना दरवषी त्यांच्या अचल संपत्तीचे अद्ययावत विवरणपत्र सरकारकडे सादर करावे लागते. त्यानुसार चालू वर्षातील माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सध्या विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, सिडकोचे मुख्य प्रशासक जगदीश मिनियार, झेडपी सीईओ अंकित, मराठवाडा विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अनिल रामोड, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक आदित्य जीवणे आणि राज्य कर विभागाचे सहआयुक्त अभिजित राऊत हे आठ आयएएस अधिकारी कार्यरत आहेत.

जगदीश मिनियार (मुख्य प्रशासक, सिडको)

२०१५ बॅचचे आयएएस अधिकारी जगदीश मिनियार यांच्या नावावर विविध शहरांमध्ये सुमारे ११ कोटी रुपयांची संपत्ती आहे. यात छत्रपती संभाजीनगरमधील सिडको एन-४ भागात ७५ लाखांचे रो-हाऊस, पुण्याच्या बाणेर भागात पत्नी व मुलाच्या नावावर १ कोटीचा फ्लॅट, नवी मुंबईत पाम बीच रोडवर १ कोटीचा सिडकोचा प्लॉट आणि नक्षत्रवाडी येथे २५ लाखांचा प्लॉट यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त संभाजीनगरमधील शिवराई व तुकाबाद तसेच अकोला जिल्ह्यातील गोंधळवाडी येथे त्यांची २९ एकर शेती असून, तिची किंमत ८ कोटी रुपये आहे.

सिडकोचे प्रशासक मिनियार सर्वात श्रीमंत !
Jalna Seed Park project : सीड पार्क : नोटिसा मिळाल्याने झोपडपट्टीधारकांची वाढली धास्ती

दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी)

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या नावावर भालकी, पुणे, छत्रपती संभाजीनगर, उदगीर, नांदेड आणि नाशिक येथे सुमारे ४ कोटींची संपत्ती आहे. यात भालकी येथे ४५ लाखांची वडिलोपार्जति शेती, पुण्याच्या हडपसरमध्ये ९९ लाखांचा फ्लॅट, संभाजीनगरच्या सातारा भागात ३० लाखांचा प्लॉट आणि नांदेडमध्ये ९५ लाखांचा भूखंड आहे. तसेच पत्नीच्या नावे नाशिक येथे १ कोटीचा फ्लॅट आणि उदगीरमध्ये १७ लाखांची शेती आहे.

डॉ. अनिल रामोड (सदस्य सचिव, मराठवाडा विकास मंडळ)

डॉ. अनिल रामोड यांच्याकडे पुणे, नांदेड आणि संभाजीनगर येथे मिळून सुमारे ३ कोटी रुपयांची संपत्ती आहे. पुण्याच्या बाणेर भागात १ कोटी २५ लाखांचा फ्लॅट, नांदेडच्या सायखेड येथे १ कोटी ३० लाखांची वडिलोपार्जति जमीन व घर आणि संभाजीनगरच्या नक्षत्रवाडीत २५ लाखांचा प्लॉट आहे.

जितेंद्र पापळकर (विभागीय आयुक्त)

पापळकर यांच्या नावावर नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मालमत्ता आहे. नागपुरात पत्नीसह संयुक्त नावावर ७० लाखांचा फ्लॅट असून, मुलगा आदित्यच्या नावे एक फ्लॅट आरक्षित आहे. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यात २१ लाख रुपये किमतीची २.८३ हेक्टर वडिलोपार्जति शेती आहे.

अभिजित राऊत (सहआयुक्त, राज्य कर)

अभिजित राऊत यांच्या नावावर पुणे जिल्ह्यातील हवेली येथे आईसोबत संयुक्त मालकीचा १ कोटी २० लाख रुपये किमतीचा फ्लॅट आहे. हा फ्लॅट त्यांनी २०२४ मध्ये खरेदी केला आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news