

पुढारी ऑनलाईन डेस्क : "लायकी शब्दावरून काही नेत्यांकडून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज्यात शांतता राहावी, जाती-जातीत वाद नको म्हणून जनतेसाठी शब्द मागे घेतला. मला शब्द मागे घ्यायला कोणीही सांगितलं नाही. जुनाट नेत्यांमुळे शब्द मागे घेतला नाही," असे मराठा आंदोलक मनोज जरांगे-पाटील यांनी म्हटले आहे. १ तारखेला जालन्याला सभा आहे. मधल्या काळात अनेकांनी संधी साधली. त्या सभेत बोलणार आहे, असेही जरांगे-पाटील यांनी सांगितले.
आज (दि.२८) छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, "प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला होता, त्यांच्याबद्दल आदर आहे म्हणून त्यांचा सल्ला मान्य केला. एका शब्दाने जातीय रंग देण्याचा प्रयत्न काहींनी केला. तेवढ्या शब्दाने महापुरूषांच्या जाती पर्यंत इतक्या खालच्या थराला गेले. राज्यात शांतता राहिली पाहिजे. हे विनाकारण त्याला जातीय रंग देत होते. जुनाट नेत्यांसाठी शब्द मागे घेतला नाही. आपल्यात माणुसकी जिवंत आहे. मी राज्यातील जाती-धर्माला मानतो, जनतेत यांनी संभ्रम निर्माण केल्याने एकोपा राहावा म्हणून तो शब्दच मागे घेतला. कालच तो विषय संपला आहे. मला शब्द मागे घ्यायला कोणीही सांगितलं नाही. जुनाट नेत्यांमुळे शब्द मागे घेतला नाही," असे जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा :