छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर पोलिसाने केला अत्याचार | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणीवर पोलिसाने केला अत्याचार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीवर धुळे कारागृहातील पोलिसाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. ही घटना २०२० ते २०२३ या काळात घडली. या प्रकरणी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शुभम नरेश गोसटकर (२५, रा. आडूळ, ता. पैठण) असे आरोपी पोलिसाचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, २५ वर्षीय पीडिता भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील आहे. २०२० पासून ती स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरातील एन-१२, हडको भागात राहते. त्याचवेळी आरोपी शुभम गोसटकर हादेखील सर्प्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी शहरात राहत होता. एका अभ्यासिकेत त्यांची ओळख झाली. ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. ते नेहमी भेटायचे. नोव्हेंबर २०२० मध्ये शुभमने पीडितेला स्वत:च्या खोलीवर बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो जेल पोलीस दलात भरती झाला. त्यानंतरही लग्नाचे आमिष दाखवून त्याने पीडितेला वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून घेत तिच्यावर अत्याचार केले.

नोकरी लागल्यावर दुसरीशी जुळले सूत

आरोपी शुभम गोसटकर याला कारागृह पोलीस दलात नोकरी लागल्यावर त्याचे दुसरीशी सूत जुळले. हा प्रकार पीडितेला समजल्यावर तिने लग्नाचा तगादा लावला. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला. अखेर, शुभमने पीडितेला लग्नास नकार दिला. त्यामुळे अखेर सिडको ठाण्यात शुभमविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचलंत का?

Back to top button