छत्रपती संभाजीनगर : जरांगेची प्रकृती स्थिर, मात्र अशक्तपणा कायम | पुढारी

छत्रपती संभाजीनगर : जरांगेची प्रकृती स्थिर, मात्र अशक्तपणा कायम

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी १७ दिवस उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर कालपासून छत्रपती संभाजीनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांच्यावर २४ तास डॉक्टरांचे लक्ष आहे. अशक्तपणा असला तरी सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून, उद्या मंगळवारी (दि.१९) सकाळी त्यांची रक्त आणि लघवीची तपासणी करुन त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे डाॅक्टरांनी सांगितले.

मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हाताने उपोषण सोडल्यानंतर दोन दिवस उपोषणस्थळीच उपचार घेतले. मात्र, त्यांची प्रकृती खालावल्याने रविवारी त्यांना उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भरती करताच डॉक्टरांनी जरांगे यांची एक्स-रे, ईसीजी, सोनोग्राफी, बीपी, शुगर यासह लघवी आणि रक्ताच्या चाचण्या केल्या. या सर्व तपासण्याचे रिपोर्ट नॉर्मल आले. मात्र, त्यांना प्रचंड अशक्तपणा डॉक्टरांनी दाखल करुन उपचार सुरु केले आहे. रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर परत आंदोलनस्थळी जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तर मंगळवारी सकाळी परत एकदा जरांगे यांची सर्व तपासण्या केल्या जातील. त्यानंतरच त्यांना रुग्णालयातून सुट्टी द्यायची की नाही, हे ठरवता येईल. असे त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. विनोद चावरे यांनी सांगितले.

हेही वाचलंत का?

Back to top button