Birmingham Bankrupt
Birmingham Bankrupt

Birmingham Bankrupt : ब्रिटनमधील दुसरे सर्वात मोठे शहर ‘बर्मिंगहॅम’ दिवाळखोर घोषित

Published on

पुढारी ऑनलाइन डेस्क : ब्रिटनमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. देशातील दुसऱे सर्वात मोठे असलेले बर्मिंगहॅम शहर दिवाळखोरीत निघाले आहे. बर्मिंगहॅम सिटी काउंसिलने स्वतः शहराला दिवाळखोर घोषित केले आहे. बर्मिंगहॅमच्या सिटी काउंसिलने मंगळवारी कलम 114 नोटीस दाखल केली. या नोटिसीप्रमाणे शहरातील अत्यावश्यक सेवा सोडल्या तर बाकी सर्व सेवा तात्काळ प्रभावाने थांबवण्यात आल्या आहेत.

Birmingham Bankrupt : सर्व अनावश्यक खर्च बंद केले

बर्मिंगहॅमने 954 मिलियन डॉलरच्या समान वेतनाचे दावे जारी झाल्यानंतर सर्व अनावश्यक खर्च बंद केले आहेत. तसेच शहराला दिवाळखोर घोषित केले. बर्मिंगहमवर अशी परिस्थिती का उद्भवली याचे कारण सांगताना समान वेतनच्या दाव्यांसाठीचा जो खर्च आला त्यामुळे ही नकरात्मक आर्थिक परिस्थिती उद्भवली आहे, असे सिटी काउंसिलने म्हटले आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, बर्मिंगहॅम सिटी काउंसिलने त्या कालावधीत आपल्या आर्थिक स्त्रोतांपेक्षा जास्त खर्च केला आहे. परिणामी शहरावर अत्यावश्यक सेवा वगळता सर्व खर्चावर बंदी घालण्याची वेळ आली आहे.

समान वेतन दाव्यांमुळे ओढावली परिस्थिती

बर्मिंगहम सिटी काउंसिलने दिलेल्या माहितीनुसार, समान वेतनच्या दाव्यांमुळे 650 मिलियन पाऊंड ते 760 मिलीयन पाऊंड इतका खर्च लागू शकतो. तर काउंसिल जवळ याची पूर्तता करण्यासाठी आवश्यक निधी नाही आहे. बर्मिंगहम सिटी काऊंसिल 10 लाख पेक्षा जास्त लोकांना सेवा प्रदान करते, असे सीएनएनने म्हटले आहे. या वर्षी 2023-24 मध्ये शहराला 87 मिलियन पाउंड इतक्या तोटा होईल, असा अनुमान आहे.

Birmingham Bankrupt : कॉमनवेल्थ गेम्सचे याच शहरात आयोजन

बर्मिंगहॅम हे युनायटेड किंगडममधील दुसरे सर्वात मोठे शहर असून हे मल्टी कल्चरल शहर आहे. या शहरात गेल्यावर्षी राष्ट्रमंडळ खेळांचे (Commonwealth Games) आयोजन करण्यात आले होते. शहराने कॉमनवेल्थ गेम्सचे यजमानपद भूषवले होते. त्यामुळे बर्मिंगहॅम शहराने स्वतःला दिवाळखोर घोषित केल्यानंतर सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

या वर्षी जून 2023 मध्ये, समान वेतनाचे दावे निकाली काढण्यासाठी £760 दशलक्ष पर्यंत देय असल्याची नोंद करण्यात आली, त्यानंतर नगर परिषदेने सांगितले की ते या विषयावर सरकारशी बोलणी करत आहेत. जूनमध्ये बीबीसीच्या एका अहवालात असेही म्हटले आहे की हे बिल सेवांवरील संपूर्ण वार्षिक खर्चाच्या बरोबरीचे आहे आणि दरमहा 14 दशलक्ष पौंडांनी वाढत आहे.

Birmingham Bankrupt : पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दिली पहिली प्रतिक्रिया

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी बर्मिंगहॅम शहराच्या दिवाळखोरीच्या वृत्तावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बर्मिंगहॅम मेलच्या वृत्तानुसार, पंतप्रधानांनी या स्थितीसाठी कामगार प्रशासनाला जबाबदार धरले आहे.

पंतप्रधानांचे प्रवक्ते मॅक्स ब्लेन यांनी या संदर्भात सांगितले की, बर्मिंगहॅममधील लोकांसाठी ही अत्यंत चिंताजनक परिस्थिती आहे. सरकारने आधीच परिषदांना त्यांच्या अंदाजपत्रकाच्या सुमारे 10% अतिरिक्त निधी प्रदान केला आहे, परंतु त्यांचे स्वतःचे बजेट व्यवस्थापित करणे स्थानिक पातळीवर निवडलेल्या परिषदांवर अवलंबून आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news