Sambhajinagar Crime : ६ महिन्यांत ५६४ दुचाकी लंपास

पोलिसांना फक्त ९९ सापडल्या; उर्वरित दुचाकी कुठे आहेत?
Chhatrapati Sambhajinagar news
Sambhajinagar Crime : ६ महिन्यांत ५६४ दुचाकी लंपासpudhari photo
Published on
Updated on

564 two-wheeler lampas in Sambhajinagar city in 6 months

प्रमोद अडसुळे

छत्रपती संभाजीनगर शहरात वाहन चोरांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या सहा महिन्यांत तब्बल ५६४ दुचाकी लंपास करत शहर पोलिसांना खुले आव्हानच दिले आहे. विशेष म्हणजे गुन्हे शाखेसह पोलिस ठाण्याच्या हाती केवळ चोरीच्या ९९ दुचाकी लागल्या. उर्वरित दुचाकींचा पोलिसांना अद्याप थांगपत्ता लागेलला नाही.

Chhatrapati Sambhajinagar news
Sambhajinagar Encroachment Campaign : दहा रस्त्यांच्या मार्किंगचे काम पूर्ण

शहरात पोलिसांचा धाक नसल्याने चोरांची प्रचंड हिंमत वाढली आहे. - दिवसा-रात्री होणाऱ्या घरफोडी, चोरीच्या घटना वेगाने वाढत आहेत. त्यातुलनेत पोलिसांचा तपास मात्र होताना दिसत नाही. गेल्या सहा महिन्यांत म्हणजेच जा-- नेवारी ते जून २०२५ या काळात शहराच्या विविध भागांतून वाहन चोरांनी तब्बल ५६४ दुचाकी चोरून नेल्या. यातील केवळ ९९ दुचाकी पोलिसांना हस्तगत करण्यात यश आले.

गतवर्षी २०२४ मध्ये शहरात १५६७ चोरीच्या - घटना घडल्या होत्या. त्यात दुचाकींचादेखील समावेश आहे. रुग्णालये, मॉल समोरील पार्किंग, रस्त्यालगत उभ्या दुचाकी, बाजारपेठ आदी ठिकाणे टार्गेट करून दुचाकी चोर हात साफ करतात असे वारंवार समोर आले आहे. मात्र, पोलिसांकडून त्यावर आहेत. शहरात वाढत्या वाहनचोरीमुळे नागरिकांना वाहने लावावीत कुठे? हॅन्डल लॉक तोडून दुचाकी चोरीला जात आहेत. पोलिसांनी या गुन्ह्यांच्या तपासासाठी विशेष मोहीम राबवून चोरट्यांना गज-आड करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Chhatrapati Sambhajinagar news
JSW : संभाजीनगरात जेएसडब्ल्यू बनविणार इलेक्ट्रिक कार

पार्ट्स विक्रीचा बाजार सुसाट दुचाकी चोरीनंतर त्या कुठे जातात, याचा ठोस तपास आजवर झाला नाही. पोलिसांच्या मते काही दुचाकी ग्रामीण भागात विकल्या जातात. मात्र, ज्या दुचाकींचे पार्ट्स वेगळे करून विक्री केली जाते. काही दुचाकी थेट लोखंड वितळविण्यासाठी पाठविल्या जातात. याचे मोठे रॅकेट अद्यापही पोलिसांना उघड करता आलेले नाही. या गोरखधंद्यात अनेकांचे हात काळे झालेले आहेत.

चोरीत टॉप ४ पोलिस ठाणे

दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याची हद्द टॉपवर आहे. येथे सहा महिन्यांत ९० दुचाकी चोरीला गेल्या, त्यातील केवळ १० दुचाकी परत मिळाल्या. त्यानंतर सिडको (७४ चोरी, १८ उघड), एमआयडीसी सिडको (५६ चोरी, ६ उघड) आणि जवाहर नगर (३९ चोरी, ८ उघड) या पोलिस ठाण्यांची स्थितीही गंभीर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news