ST Smart Card : एसटीच्या स्मार्ट कार्डसाठी ५५ हजार जणांची नोंदणी

सर्वच ठिकाणी वितरणाच्या कामात दिरंगाई
ST bus smart card rule
एसटी सवलतधारकांनो सावधान! आता स्मार्ट कार्डशिवाय प्रवास नाहीpudhari photo
Published on
Updated on

55,000 Registrations for ST Smart Cards

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डच्या नोंदणीच्या कामाला वेग आला असून, जिल्ह्यात असलेल्या आगारांतून सुमारे ५५ हजार जणांनी नाव नोंदणी केली आहे. यात ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ, महिला प्रवाशांचा सहभाग आहे.

ST bus smart card rule
Smart card : स्मार्ट कार्ड वितरणाचे नियोजन ढासळले; ज्येष्ठांची कार्ड मिळवण्यासाठी फरपट

दरम्यान, नोंदी केलेल्या लाभार्थीना स्मार्ट कार्डचे वितरणही सुरू करण्यात आले आहे. दरम्यान, वितरणात एजन्सीधारकांकडून दिरंगाई होत असल्याने ज्येष्ठ नागरिकांसह महिलांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. यात तात्काळ सुधारणा करावी, अशी मागणी लाभार्थीकडून होत आहे.

जिल्ह्यात मार्च अखेरपर्यंत सुमारे १६ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ आणि महिलांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली होती. त्यात झपाट्याने वाढ होत असून, ही संख्या मे अखेरपर्यंत सुमारे ५५ हजारांवर गेली आहे. नाव नोंदणी केलेल्या लाभार्थीना कार्ड वितरण सुरू करण्यात आले आहे. हा आकडा केवळ आगारांत असलेल्या एजन्सीचा आहे. जिल्ह्यात प्रत्येक गावात ही एजन्सी नेमण्यात आली आहे. त्याचा आकडा मोठ्या प्रमाणात राहणार आहे.

ST bus smart card rule
विविध योजनांतून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास : पालकमंत्री बोर्डीकर

वितरणात दिरंगाई, लाभार्थी नाराज

दरम्यान, स्मार्ट कार्ड वितरणात होत असलेल्या विलंबामुळे लाभार्थी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, वितरण प्रक्रियेला वेग द्यावा. लाभार्थी महिला आणि ज्येष्ठ, अमृत ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन एसटी महामंडळाने एजन्सीधारकांना कार्डचे वितरण सुरळी आणि वेगाने करण्याच्या सूचना द्याव्यात, अशीही मागणी प्रवाशांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news