Smart card : स्मार्ट कार्ड वितरणाचे नियोजन ढासळले; ज्येष्ठांची कार्ड मिळवण्यासाठी फरपट

एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे.
Smart card
Smart card : स्मार्ट कार्ड वितरणाचे नियोजन ढासळले; ज्येष्ठांची कार्ड मिळवण्यासाठी फरपटfile photo
Published on
Updated on

Smart card distribution planning has collapsed; Senior citizens are scrambling to get cards

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी आवश्यक असलेल्या स्मार्ट कार्डचे वितरण सुरू करण्यात आले आहे. कार्ड वितरणाचे नियोजन ढासळल्याने ज्येष्ठांसह महिलांची चांगलीच फरपट होत आहे. सिडको बसस्थानकावर कार्ड मिळवण्यासाठी तासंतास ज्येष्ठांसह महिलांना तिष्ठत बसावे लागले.

Smart card
Chhatrapati Sambhajinagar ST card issue : एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण

जिल्ह्यात मार्चअखेरपर्यंत सुमारे १६ हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ आणि महिलांनी स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. अनेक नागरिकांनी अर्ज करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली असतानाही त्यांना कार्ड मिळालेले नाही. नोंदणीनंतर २० दिवसांत कार्ड मिळेल, असे संबंधित एजन्सीकडून सांगण्यात आले होते.

मात्र तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया रखडली होती. नुकतीच सर्वच एजन्सीधारकांकडे नोंदणी केलेल्यांचे स्मार्ट कार्ड आलेले आहेत. एकाच वेळी सर्वांनाच कार्ड देण्यात येत असल्याने सिडको बसस्थानकांवर एकच गोंधळ उडाला. सकाळपासून रांगेत उभे असलेल्या ज्येष्ठांसह महिलांना दुपार पर्यंतही कार्ड न मिळाल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला. कार्ड वितरणसाठी नियोजनांचा अभाव असल्याने हा गोंधळ उडाल्याचे लाभार्थीनी सांगितले.

Smart card
एसटीचे स्मार्ट कार्ड बनले लुबाडणुकीचे कुरण

टप्प्याटप्प्याने वितरण आवश्यक

नोंदणी केलेल्यांचे स्मार्ट आल्यानंतर याचे वितरण टप्प्याटप्प्याने करणे आवश्यक होते. असे न करता सर्वांनांच कार्ड आल्याचा संदेश दिल्याने लाभार्थीनी सकाळपासून सिडको बसस्थानकावर रांगा लावल्या होत्या. अचानक गर्दी वाढल्याने एजन्सीधारकालाही कार्डची नोंद घेऊन ते वितरीत करणे जिकरीचे बनले होते. पहिल्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ आणि महिलांना स्मार्ट कार्ड देण्यात येत आहे. मात्र अधिस्वीकृतीधारक पत्रकार, दिव्यांग आणि इतर सवलतधारकांना जुन्याच पद्धतीने पास वितरित करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news