Sambhajinagar News : चिकलठाण्यातील ५०९ प्लॉटधारकांची पालकमंत्र्यांकडे धाव

मनपाने कुंपण, शेड तोडल्याने नुकसानीचा आरोप
Sambhajinagar News
Sambhajinagar News : चिकलठाण्यातील ५०९ प्लॉटधारकांची पालकमंत्र्यांकडे धावfile photo
Published on: 
Updated on: 

509 plot holders from Gat No. 638 in Chikalthana met Guardian Minister Sanjay Shirsat to protest against the Municipal Corporation's action

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा चिकलठाणा येथील गट क्रमांक ६३८ मधील ५०९ प्लॉटधारकांनी महापालिकेच्या कारवाईविरोधात शुक्रवारी (दि.९) पालकमंत्री संजय शिरसाट यांची भेट घेत न्यायाची मागणी केली. दोन दशकांपूर्वी खरेदी केलेल्या प्लॉटवरील जाळीचे कुंपण आणि शेड महापालिकेने ६ ऑक्टोबर रोजी तोडल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. कोणावरही अन्याय होऊ देणार नसल्याचे आश्वासन देतानाच, अनधिकृत प्लॉटधारकांनी गुंठेवारी करून प्लॉट नियमित करून घ्यावेत, असे आवाहन शिरसाट यांनी केले.

Sambhajinagar News
Sambhajinagar News : पडेगावातील राडाप्रकरणी नगरसेवकासह तिघांना अटक

प्लॉटधारकांच्या म्हणण्यानुसार, चिकलठाण्यातील गट क्रमांक ६३८ मधील १० एकर २० गुंठे जमिनीवर मूळ मालक मदनलाल चांडक यांनी २००३ मध्ये २० बाय ३० फुटांचे ५०९ प्लॉट पाडून त्यांची विक्री केली. १९९७ ते २००० या कालावधीतील व्यवहारांची खरेदीखते आणि आवश्यक कागदपत्रे आपल्याकडे असल्याचा दावा नागरिकांनी केला.

अनेकांनी गुंठेवारी प्रक्रिया पूर्ण केली असून, काहींनी वीज मीटरसाठी कोटेशनही भरले आहे. तसेच प्लॉटचा ताबा असतानाही महापालिकेने कुंपण आणि शेडवर कारवाई केल्याने नागरिकांनी पालकमंत्र्यांकडे धाव घेतली. दरम्यान, मूळ मालकाकडून प्लॉट पुन्हा हडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या प्रकरणात न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली.

Sambhajinagar News
Teachers Surplus News : २८३ शिक्षक अतिरिक्त, तरी वैजापुरात ७६ जागा रिक्त !

९८ आर जमिनीवरील कुंपण तोडले

याच गटातील प्रकाश राणा यांच्या ९८ आर जमिनीच्या संरक्षणासाठी उभारलेल्या तारांच्या कुंपणावरही महापालिकेने प्लॉटिंग समजून जेसीबी चालवल्याचा आरोप आहे. या कारवाईत सुमारे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगत राणा यांनी महापालिकेकडे भरपाईची मागणी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news