Sambhajinagar News : पडेगावातील राडाप्रकरणी नगरसेवकासह तिघांना अटक

दोघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी; ड्रेनेजच्या पाहणीवरून रावरसपुरा भागात शस्त्रे घेऊन भिडले होते दोन गट
Sambhajinagar News
Sambhajinagar News : पडेगावातील राडाप्रकरणी नगरसेवकासह तिघांना अटकfile photo
Published on: 
Updated on: 

Three arrested, including a corporator, in connection with the clash in Padegaon

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : पडेगाव परिसरातील रावरसपुरा भागात शुक्रवारी (९ ऑक्टोबर) भरदुपारी ड्रेनेज लाईनच्या पाहणीवरून दोन गटांत शस्त्रांसह हाणामारी आणि वाहनांची तोडफोड झाल्याचा प्रकार घडला. या गंभीर प्रकरणात छावणी पोलिसांनी विद्यमान नगरसेवक गणेश लोखंडे आणि अर्जुन लोखंडे यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांनाही दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती छावणी पोलिस ठाण्याचे प्रभारी डॉ. विवेक जाधव दिली. तर रविवारी (दि.११) तिसरा आरोपी किशोर जाधव यालाही अटक केल्याचे त्यांनी सांगितले.

Sambhajinagar News
Crime News : कुख्यात मुक्या साळवेचा गावठी कट्टा सांभाळणारा तरुण गजाआड

या प्रकरणात अटक करण्यात आलेले गणेश लोखंडे हे नगरसेवक असून ते महापालिकेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गटनेते आहेत. घरावर चालून जाऊन शस्त्रांनी हल्ला केल्याप्रकरणी छावणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिल्या गटाकडून फजलउल्ला मोहम्मद नदीम अजमत (२७) यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी दुपारी फजलउल्ला पोलिस ठाण्यात असताना, नगरसेवक गणेश लोखंडे, अर्जुन लोखंडे आणि त्यांचे इतर १० ते १५ साथीदार घरावर चालून आल्याची माहिती त्यांना भावाकडून मिळाली. जमावाने घराची व इनोव्हा कारची तोडफोड केली.

फजलउल्ला यांनी घरी पोहोचून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला असता, संतापलेल्या जमावाने त्यांच्यावर चाकूने वार केले. यात फजलउल्ला यांच्या डाव्या बरगडीत, पायावर आणि हातावर गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या फिर्यादीवरून नगरसेवकासह १५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गंभीर घटनेनंतर पोलिसांनी नगरसेवक गणेश लोखंडे आणि अर्जुन लोखंडे यांना चाळीसगाव घाटातून अटक केली. तर लोखंडे यांचा चालक जाधव यालाही रविवारी अटक करण्यात आली.

Sambhajinagar News
FDA : सातारा परिसरातील 'क्लिफ ऑल डे डायनिंग' हॉटेलचा परवाना निलंबित

लोखंडे यांच्या वाहन चालकावरही वार

दुसऱ्या गटाकडून नगरसेवक लोखंडे यांचा वाहन चालक किशोर गोरख जाधव (३०) याने फिर्याद दिली आहे. त्यानुसार, रावरसपुरा येथे मनपा कर्मचारी ड्रेनेजची पाहणी करत असताना नदीमची मुले फजलउल्ला आणि रजा तेथे आले. त्यांनी लोखंडे यांच्याशी वाद घातला आणि काही वेळातच ते धारदार शस्त्रे घेऊन अंगावर धावून आले. मध्यस्थी करण्यासाठी गेलेला चालक किशोर याच्या छातीवर, दंडावर व तळहातावर वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले, तसेच जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. या फिर्यादीवरून नदीम आणि त्याच्या दोन मुलांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news