Fraud Case : सख्ख्या पुतणीनेच काकाला गंडवले

आकर्षक परताव्याचे आमिष दाखवून सेवानिवृत्तीचे ४५ लाख हडपले; १३ जणांविरुद्ध गुन्हा
Fraud Case
Fraud Case pudhari photo
Published on
Updated on

₹45 lakh in retirement savings siphoned off by luring with promises of attractive returns; case registered against 13 individuals

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : ज्येष्ठ नागरिकांना जास्तीच्या परताव्याचे आमिष दाखवून फसवणूक होण्याच्या घटना शहरात वाढत असतानाच, एका निवृत्त कर्मचाऱ्याला त्यांच्या सख्ख्या पुतणीनेच तब्बल ४५ लाख ५ हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी जवाहर नगर पोलिस ठाण्यात मुख्य सूत्रधार पुतणीसह १३ जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Fraud Case
Black-marketing : रेशनसह चिमुकल्यांच्या पोषण आहाराचा काळाबाजार

कल्याणी रमेश ढोरे (रा. पिंपरी चिंचवड), सुमित कदम, क्रिस्तीना, कविता, राजु, वनलानुनथरी, आशिष वाणी, अदैल्लु, मोहम्मद सिराजोद्यीन, इस्माईल न्युमो, नरेश कटारीया, रेहान खान आणि इम्रान अली अशी १३ आरोपींची नावे आहेत.

फिर्यादी श्रीकृष्ण आनंदराव ढोरे (७२, रा. सुमंगल विहार, गारखेडा) हे २०१४ मध्ये 'बीएसएनएल'मधून सेवानिवृत्त झाले असून, त्यांना निवृत्तीचे सुमारे ४५ लाख रुपये मिळाले होते. ही रक्कम त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया, अमरप्रीत शाखेत ठेवली होती. त्यांचा चुलत भाऊ रमेश ढोरे याची मुलगी कल्याणी रमेश ढोरे (सध्या रा. पिंपरी चिंचवड, पुणे) हिचे काकांच्या घरी नेहमी येणे-जाणे होते.

Fraud Case
Jalna News : जालना जिल्ह्यासाठी ८ हजार ५१५ कोटींचा वार्षिक पत आराखडा !

काकांकडे निवृत्तीची मोठी रक्कम असल्याची माहिती तिला होती. "बँकेत रक्कम ठेवून जास्तीचा व्याज मिळणार नाही. मी सांगते तिथे गुंतवणूक केल्यास एका वर्षाच्या आत मोठा परतावा मिळवून देते," अशी हमी देत कल्याणीने काकांचा विश्वास संपादन केला.

व्हॉट्सअॅपवर पाठवला ६८ लाखांचा बनावट चेक

गुंतवणूक केल्यानंतर सहा महिन्यांनी ढोरे यांनी पैशांबाबत विचारणा केली. तेव्हा "पैसे योग्य ठिकाणी गुंतवले आहेत, काळजी करू नका" असे सांगून कल्याणीने त्यांच्या व्हॉट्सअॅपवर चक्क ६८ लाख रुपयांच्या सिटी बँकेच्या चेकचा फोटो पाठवला. मात्र, काही वेळातच तिने तो मेसेज डिलीट करून टाकला.

वेळोवेळी विचारणा करूनही ती उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर श्रीकृष्ण ढोरे यांनी जवाहर नगर पोलिसांततक्रार दिली होती. चौकशीनंतर बुधवारी (दि. १) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक उपनिरीक्षक सीताराम केदारे करत आहेत.

परस्पर वळवले पैसे

जुलै ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत कल्याणीने ढोरे यांना चेक बुक व पास बुकसह बँकेत नेले. तिथे त्यांच्या कोऱ्या चेकवर स्वाक्षरी घेऊन आणि स्वतःच्या हस्ताक्षरात आरटीजीएस/एनइएफटी स्लिप भरल्या. ढोरे यांच्या खात्यातील तब्बल ४५ लाख ९५ हजार रुपये तिने स्वतःच्या ओळखीच्या १२ अनोळखी व्यक्तींच्या खात्यांवर ट्रान्सफर केले. यापैकी केवळ सुमित कदमच्या खात्यावरून ९० हजार रुपये ढोरे यांना परत आले. प्रत्यक्ष ४५ लाख ५ हजार रुपयांची फसवणूक झाली.

सेमिनारला हजेरी

कल्याणी हिने श्रीकृष्ण यांना १८ जुलै २०१९ रोजी लखनौ येथे इंडियाज बिजनेस कॉन्क्लेव्ह २०१९ या सेमिनारसाठी घेऊन गेली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news