Water Tanker : मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांत २७७ टँकर

१६० गावे, ९३ वाड्यांत पाणी टंचाई, बीडमध्ये सर्वाधिक
Water Tanker
Water Tanker : मराठवाड्याच्या चार जिल्ह्यांत २७७ टँकरfile photo
Published on: 
Updated on: 

277 tankers in four districts of Marathwada

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठवाड्यात कमी पर्जन्यमानामुळे पाणी टंचाईचे संकट वाढत आहे. विभागातील छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना आणि धाराशिव या चार जिल्ह्यांत बिकट स्थिती असून येथील १६० गावे आणि ९३ वाड्यांना सध्या २७७ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ ९ दिवसांत तब्बल ३१ टँकर वाढले आहेत.

Water Tanker
Chhatrapati Sambhajinagar water supply : हर्सल टी पॉइंटवर पुन्हा फुटली ७०० मिमीची जलवाहिनी

मराठवाड्याकडे यंदाच्या मान्सूनात पावसाने पाठ फिरवली आहे. त्यामुळे विभागातील आठही जिल्ह्यांमध्ये शासनाने ट्रिगर-१ लागू करीत दुष्काळ जाहीर केला आहे. जून, जुलैमध्ये बऱ्यापैकी हजेरी लावल्यानंतर ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये पावसाने अनुक्रमे तब्बल २६ आणि २५ अशी ५१ दिवस दडी मारली आहे. त्यामुळे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सध्या पिण्याच्या पाण्याची भीषण स्थिती निर्माण झाली आहे.

त्यात सर्वाधिक चिंताजनक स्थिती ही बीड जिल्ह्याची असून येथील तब्बल ६५ गावे आणि ६८ वाड्यांमध्ये १२७ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. त्यापाठोपाठ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२०, जालना जिल्ह्यात २२, तर धाराशिव जिल्ह्यात ५ टँकर सुरू आहेत. परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांत सध्या टँकरची गरज नसल्याचे अहवालातून स्पष्ट होते.

दरम्यान, खासगी विहिरी अधिग्रहित करूनही अनेक भागांतील पाणीप्रश्न कायम असल्याचे चित्र आहे मराठवाड्यातील पावसातील खंड, अपुरा पाऊस आणि उपलब्ध जलस्रोतांवरील वाढता ताणामुळे आगामी काळात टंचाईचे संकट आणखीच गडद होण्याची शक्यता आहे.

Water Tanker
Gangakhed Crime News : उधारीचे दोन हजार रुपये मागितल्याच्या रागातून महिलेचा खून

५४८ विहिरी अधिग्रहित

मराठवाड्यात पावसाअभावी आठपैकी सहा जिल्ह्यांमध्ये नागरिकांची तहान भागविण्यासाठी आतापासूनच विहिरी अधिग्रहित करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. यासाठी विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात टँकरसाठी ३५ व नागरी वसाहतींसाठी ४ अशा ३९ विहिरी अधिग्रहित केल्या. तर जालन्यात २४, परभणी ३, बीड ५७, लातूर २३०, धाराशिव १९५ अशा एकूण ५४८ विहिरींचा समावेश आहे. तर हिंगोली, नांदेड दोन जिल्ह्यांत सध्या एकही विहीर अधिग्रहित झालेली नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news