Gangakhed Crime News : उधारीचे दोन हजार रुपये मागितल्याच्या रागातून महिलेचा खून

दोन महिला आरोपींना सश्रम जन्मठेप ; गंगाखेड न्यायालयाचा निकाल
Gangakhed Crime News
Gangakhed Crime News : उधारीचे दोन हजार रुपये मागितल्याच्या रागातून महिलेचा खूनfile photo
Published on: 
Updated on: 

Woman murdered in a fit of rage after asking for the repayment of two thousand rupees

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा : उधारीने दिलेले दोन हजार रुपये परत मागितल्याच्या कारणावरून महिलेचा खून केल्याप्रकरणी दोन महिला आरोपींना गंगाखेड येथील न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपी महाकाली ऊर्फ त्रिवेणी राहुल घुंबरे व मनकरना नवनाथ रणखांबे अशी आरोपींची नावे आहेत. अपर सत्र न्यायाधीश-२ व्ही. एम. सुंदाळे यांनी हा निकाल दिला.

Gangakhed Crime News
Marathwada University Logo Misuse: विद्यापीठाच्या लोगोचा गैरवापर करत ठेकेदाराकडून कुशल कामगारांची भरती

न्यायालयीन माहितीनुसार, मृत रेखा विष्णू लोखंडे यांच्या मुलाने आरोपी महाकाली ऊर्फ त्रिवेणी व मणकर्णी यांना हातउसने दिलेले दोन हजार रुपये मागितले होते. याचा राग मनात धरून आरोपींनी रेखा लोखंडे यांच्यावर हल्ला केला.२ जून २०२४ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास सोनपेठ तालुक्यातील शेळगांव येथील फिर्यादीच्या राहत्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर हा प्रकार घडला. आरोपींनी रेखा लोखंडे यांच्या छातीवर सिमेंटचा रॉड आपटला, तसेच पायाने मारहाण केली.

त्यावेळी रेखा या मोठमोठ्याने ओरडत असताना फिर्यादी व तिची मुलगी त्यांना वाचविण्यासाठी बाहेर आल्या. आरोपी महाकाली हिने फिर्यादीच्या गालावर थप्पड मारून खाली पाडले. त्यानंतर रेखा यांना मारहाण करून आरोपी घटनास्थळावरून निघून गेल्या. गंभीर जखमी रेखा लोखंडे यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सोनपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.

तत्कालीन तपास अधिकारी पोलीस निरीक्षक सुर्यमोहन गोलमवाड यांनी तपास करून आरोपींविरुद्ध गंगाखेड येथील न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण १३ साक्षीदारांची तपासणी करण्यात आली. यामध्ये फिर्यादी, प्रत्यक्षदर्शी मृताची मुलगी, वैद्यकीय अधिकारी तसेच तपासी अधिकाऱ्यांची साक्ष महत्त्वाची ठरली.

Gangakhed Crime News
Sambhajinagar Temple Theft | गणेशपूर मंदिरातून २ लाख २० हजारांचा चांदीचा ऐवज लंपास

सरकार पक्षातर्फे मांडण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून अपर सत्र न्यायाधीश-२ व्ही. एम. सुंदाळे यांनी दोन्ही आरोपींना जन्मठेप व प्रत्येकी १० हजार हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तसेच आरोपी महाकाली ऊर्फ त्रिवेणी हिला तीन महिने साधा कारावास व पाच हजार रुपये दंड सुनावण्यात आला. दंडाच्या रकमेतून मृताच्या वारसांना १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले.

या प्रकरणात जिल्हा सहायक सरकारी वकील डी.यू. दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सरकारी अभियोक्ता एस. बी. पाळ यांनी सरकार पक्षातर्फे युक्तिवाद केला. त्यांना सहायक सरकारी वकील एस. डी. वाकोडकर, सोनपेठ ठाण्याचे एम. डी. कुंडगीर, कोर्ट पैरवी कर्मचारी एल.एच. मुंढे, एल.पी.सी. जिंकलवाड, तसेच जे. एच. पठाण यांनी सहकार्य केले.

logo
Pudhari News
pudhari.news