Marathwada Draught : वाहने धुण्यासाठी मराठवाड्यात रोज २.२० कोटी लिटर पाण्याची नासाडी

भीषण दुष्काळात संतापजनक चित्र, सामाजिक भान हरपले
Marathwada Draught
Marathwada Draught : वाहने धुण्यासाठी मराठवाड्यात रोज २.२० कोटी लिटर पाण्याची नासाडीfile photo
Published on: 
Updated on: 

22 million litres of water wasted daily in Marathwada for washing vehicles

राहुल जांगडे

छत्रपती संभाजीनगर : राज्यात भीषण दुष्काळी परिस्थितीने उग्र रूप धारण केले आहे. पाऊसाअभावी पिके करपून खाक झाली. आता थेंब थेंब पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांना प्यायला पाणी उरलेले नाही. शहरांमध्येही आठ-दहा दिवसांआड होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर कपातीचे संकट घोंघावत आहे. अशी विदारक परिस्थिती असताना दुसरीकडे मात्र निव्वळ 'हौस' म्हणून वाहने चकाकण्यासाठी मराठवाड्यात रोज सुमारे २ कोटी २० लाख लिटरपेक्षा जास्त पाण्याची अमानुष नासाडी सुरू असल्याचे संतापजनक चित्र आहे.

Marathwada Draught
Sugarcane Price Protest | बारामती ॲग्रोने प्रतिटन ४२०० रुपये ऊसदर द्यावा; 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात सुमारे १० ते १२ हजार वॉशिंग सेंटर्स सुरू आहेत. शहरातील अनेक भागात रस्त्या-रस्त्यांवर अगदी गल्लीबोळातही वॉशिंग सेंटर सुरू आहे. एका वॉशिंग सेंटरवर रोज साधारण १५ दुचाकी आणि ५ पेक्षा अधिक चारचाकी गाड्या धुतल्या जातात. अनेक ठिकाणी नळाला थेट पाइप लावून किंवा प्रेशर पंपाव्दारे पाण्याचा बेसुमार मारा करून गाड्या धुतल्या जातात, ज्यामुळे पाण्याची नासाडी अधिक होते. याशिवाय विविध वाहनांचे शेकडो शोरुम्स, सव्हींस सेंटर, लहान-मोठे हजारो गॅरेज आणि घराघरांत दररोज धुतल्या जाणाऱ्या वाहनांची संख्या वेगळीच आहे. बहुतांश ठिकाणी हे पाणी जमिनीच्या पोटातून बोअरवेलद्वारे बेसुमार उपसले जाते. या भीषण दुष्काळी परिस्थितीत आपली दुचाकी, चारचाकी गाड्या चकाचक ठेवण्याच्या नादात लाखो लिटर पिण्यायोग्य पाणी वाया जात आहे. पाण्याचा हा अपव्यय असाच सुरू - राहिला, तर येत्या दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होण्याची चिन्हे आहेत.

प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज

दुष्काळी परिस्थितीत पाण्याची नासाडी रोखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. वॉशिंग, सव्र्व्हिसिंग सेंटरवर पाण्याचा पुनर्वापर सक्तीचा करावा किंवा कोरड्या पद्धतीने वाहने पुसण्यास प्राधान्य द्यावे. नागरिकांनीही सामाजिक जबाबदारीचे भान घेऊन वाहने धुणे टाळावे.

Marathwada Draught
Gangapur Water Shortage : गंगापूर तालुक्यात दुष्काळाच्या झळा तीव्र

एका दुचाकीला ५०, तर चारचाकीसाठी लागते २०० लिटर पाणी याबाबत विविध वॉशिंग सेंटरवरील कर्मचाऱ्यांनी सांगितलेल्या माहितीनूसार, प्रेशरच्या माध्यमातून एक दुचाकी धुण्यासाठी ४० ते ५० लिटर पाणी लागते. तर एका कारसाठी सुमारे २०० लिटर पाणी फुकट घालवले जाते. प्रत्येक वॉशिंग सेंटरवर रोज सरासरी १५ दुचाकी आणि ५ चारचाकी वाहने धुतली जातात. यानूसार एका वॉशिंग सेंटरवर रोज तब्बल २ हजारहून अधिक लिटर पाणी गटारातून वाहून जाते.

पाण्यासाठी जनावरांचा टाहो

ग्रामीण भागात पिण्यासाठी अन् चाऱ्यासाठी पाणी नसल्याने शेतकरी आपली जिवापाड जपलेली जनावरे विकत आहे. तर कित्येक ठिकाणी जनावरांना मोकाट सोडून देण्याची विदारक वेळ आली आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.