Sugarcane Price Protest | बारामती ॲग्रोने प्रतिटन ४२०० रुपये ऊसदर द्यावा; 'स्वाभिमानी'चा रास्ता रोको

कन्नड तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावरील पानपोई फाट्यावर शेतकऱ्यांचा ठिय्या; आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार
Kannad Taluka  Swabhimani Shetkari Sanghatana Rasta Roko
Kannad Taluka Swabhimani Shetkari Sanghatana Rasta RokoPudhari
Published on: 
Updated on: 

Kannad Taluka Swabhimani Shetkari Sanghatana Rasta Roko

कन्नड : बारामती ॲग्रो साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिटन ४२०० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने कन्नड तालुक्यातील पानपोई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू करण्यात आले आहे. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या देत वाहतूक रोखली असून, ऊसदराचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेश कमिटी सदस्य कृषिभूषण भाऊसाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू करण्यात आले. बारामती ॲग्रो कारखान्याने ऊस उत्पादकांना प्रतिटन ४२०० रुपये दर द्यावा, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे.

ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि उसाला मिळणारा योग्य मोबदला या मुद्द्यांवरून शेतकरी आक्रमक झाले आहेत. पानपोई फाटा येथे राष्ट्रीय महामार्गावर आंदोलन सुरू झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

कारखान्याने ऊसदराच्या मागणीबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलकांनी दिला आहे. ऊसदराच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.