Job Fair : एमआयडीसीच्या मेळाव्यात १६७ बेरोजगारांना मिळाला रोजगार

२४८ जणांना फेरमुलाखतीसाठी कंपन्यांकडून बोलावणे
Job Fair
Job Fair : एमआयडीसीच्या मेळाव्यात १६७ बेरोजगारांना मिळाला रोजगारfile photo
Published on
Updated on

Job Fair167 unemployed individuals secured employment at the MIDC job fair

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : शेंद्रा एमआयडीसी येथील कौशल्य विकास केंद्रातर्फे मंगळवारी (दि.२८) घेण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात १६७विद्यार्थ्यांची जागेवरच निवड करण्यात आली. तर २४८ जणांना फेर मुलाखतीसाठी सहभागी २३ कंपन्यांकडून बोलावण्यात आले. जागेवरच नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मेळाव्यात ४१५ विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित होते.

Job Fair
Sambhajinagar News : बौद्ध लेणी, हनुमान टेकडी परिसरात अश्लील वर्तन कराल तर थेट गुन्हा दाखल

कौशल्य एमआयडीसीच्या विकास केंद्रात आयोजित या रोजगार मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. ए.एम. जिंतूरकर, प्रा. अभय गिरी यांनी रोजगाराच्या संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.

या कौशल्य विकास केंद्राचे संचालक डॉ. जी.एम. वाघमारे यांनी सांगितले की, केंद्रामार्फत दर महिन्याला अशा रोजगार मेळाव्यांचे नियमित आयोजन करण्यात येते. या उपक्रमाला औद्योगिक क्षेत्रातील कंपन्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात केंद्र महत्त्वाची भूमिका बजावत आहे. उद्योग जगताला लागणारे कुशल मनुष्यबळ आणि तरुण वर्ग यांच्यातील दुवा म्हणून हे व्यासपीठ प्रभावी ठरत आहे.

Job Fair
Shri Sant Eknath Maharaj : जातो माघारी पंढरीनाथा; तुझे दर्शन झाले आता

सामंजस्य करार

या मेळाव्यात कौशल्य विकास केंद्राने एका औद्योगिक कंपनीसोबत तसेच शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयासोबत सामंजस्य करार (एमओयू) केला. याशिवाय आणखी ९ औद्योगिक कंपन्यांनी केंद्रासोबत सामंजस्य करार करण्याबाबत सकारात्मक भूमिका दर्शविली असून, लवकरच त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news