RTO : पाच महिन्यांत आरटीओच्या तिजोरीत १५० कोटींची भर

३४ हजार वाहनांची नोंदणी, दुचाकींची संख्या २५ हजारांवर
RTO
RTO : पाच महिन्यांत आरटीओच्या तिजोरीत १५० कोटींची भर File Photo
Published on
Updated on

150 crore addition to RTO's treasury in five months

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्त-सेवा: दिवसेंदिवस वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. १ एप्रिल ते ३१ ऑगस्ट-२०२५ या पाच महिन्यांच्या कालावधीत ३४ हजार ९४ नवीन वाहन नोंदणी व इतर स्रोतांतून आरटीओ कार्यालयाच्या तिजोरीत १५० कोटी ८ लाख ५७हजार २२९ रुपयांच्या महसुलाची भर पडली असल्याची माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काठोळे यांनी दिली.

RTO
GST reduction : जीएसटी कपातीमुळे इलेक्टॉनिक्स मार्केटला अच्छे दिन

१ एप्रिल ते ३१ ऑगस्ट या काळात आरटीओ कार्यालयाकडे नवीन ३४ हजार ९४ नवीन वाहनांची नोंद झाली असून, या वाहनांच्या मालकांकडून आरटीओ कार्यालयाने विविध करापोटी १५० कोटी ८ लाख ५७ हजार २२९ रुपयांचा महसूल वसूल केला आहे. नोंदणी कर वाहनांच्या किमतीवर आकारली जाते. त्यामुळे सर्वात जास्त कर हा वाहन नोंदणीतून मिळतो. हा महसूल नवीन वाहन नोंदणीसह इतर कर आकारणी आणि दंडातून मिळाला आहे.

कारच्या संख्येत वाढ

या पाच महिन्यांत दुचाकीच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात भर पडली आहे. पाच महिन्यांत ३४ हजार ९४ वाहनांपैकी २५ हजार २६५ दुचाकी रस्त्यावर आल्या आहेत. यात दुचाकी, स्कूटर, मोपेड, आणि २५ सीसीच्या दुचाकींचा समावेश आहे. या पाठोपाठ कारही मोठ्या प्रमाणात रोडवर उतरल्या आहेत. या पाच महिन्यांत सुमारे ४ हजार ४४५ कारची वाहन संख्येत भर पडली आहे.

RTO
Sambhajinagar Crime : तब्बल ३८ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्याला केले गजाआड

ट्रॅक्टरच्या मागणीतही वाढ

मे महिन्यातच शेतीच्या मशागतीला सुरुवात होते. शेती कामांसाठी ट्रॅक्टर मोठी भूमिका पार पाडत आहे. शेतकऱ्यांकडून ट्रॅक्टरची खरेदी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या पाच महिन्यांत सुमारे १ हजार ५०३ ट्रॅक्टरची नोंदणी आरटीओ कार्यालयात झाली आहे. यात आणखी मोठी वाढ होण्याची शक्यता काठोळे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news