Sambhajinagar Crime : तब्बल ३८ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्याला केले गजाआड

फिंगर प्रिंटवरून चिकलठाण्याची घरफोडी वर्षभरानंतर उघड
Sambhajinagar Crime
Sambhajinagar Crime : तब्बल ३८ गुन्हे दाखल असलेल्या अट्टल घरफोड्याला केले गजाआड File Photo
Published on
Updated on

Arrested house burglar, who has as many as 38 cases registered

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : उच्चभ्रू वसाहतींना टार्गेट करून घरफोड्या करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला सोलापूर जेलमधून गुन्हे शाखेने ताब्यात घेऊन चिकलठाण्याची घरफोडी वर्षभरानंतर अखेर उघड केली. त्याच्या फिंगर प्रिंटवरून गुन्हा निष्पन्न केला. घरफोडीतील सोने घेणाऱ्या मुंबईच्या सराफा काका-पुतण्यालाही अटक करून ९ तोळे सोने जप्त केले.

Sambhajinagar Crime
EVM : मराठवाड्यातील ३५९१ नादुरुस्त ईव्हीएम संभाजीनगरात जमा

अनिल मिस्त्री राजबर (३८, रा. जौनपूर, उत्तरप्रदेश) असे ३८ गुन्हे करणाऱ्या आरोपीचे नाव तर रोनक योगेश सिंघवी (२८) आणि ललित बाबुलाल सिंघवी (५१, दोघेही रा. साकीनाका) अशी सराफ्याची नावे असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संभाजी पवार यांनी मंगळवारी (दि.९) दिली.

फिर्यादी आकाश राजेंद्र देऊळगावकर (रा. सी-२, प्राईड फिनिक्स, चिकलठाणा) हे बँकेत मॅनेजर आहेत. २० जून २०२४ रोजी त्यांची आई शाळेवर तर पत्नी कंपनीत कामावर गेली होती. दुपारी पावणेचारच्या सुमारास तोंडाला मास्क लावून आलेल्या चोराने फ्लॅट फोडून अवघ्या दहा मिनिटांत सुमारे ९ तोळ्यांचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तपास सुरु केला होता.

Sambhajinagar Crime
GST reduction : जीएसटी कपातीमुळे इलेक्टॉनिक्स मार्केटला अच्छे दिन

दरम्यान, वर्षभरापासून आरोपी पोलिसांना सापडत नव्हता. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक प्रवीण वाघ यांना तपास करताना या सध्या घरफोडीतील आरोपी सोलापूर कारागृहात असल्याची माहिती मिळाली. त्यांनी अनिल राजबरला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. तेव्हा त्याने गुन्ह्यातील सोने साकीनाका येथील सराफा सिंघवीला विक्री केल्याची माहिती दिली. त्यावरून पोलिसांनी तपास केला. गुन्हे शाखेने सिंघवी काका-पुतण्याला ताब्यात घेऊन गुन्ह्यातील ९ तोळे सोन्याची लगड जप्त केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी पवार, उपनिरीक्षक प्रवीण वाघ, जामदार सुनील जाधव, नवनाथ खांडेकर, अंमलदा सोमकांत भालेराव, विजय निकम कृष्णा गायके यांनी केली.

सहा महिन्यांपासून सोलापूरच्या जेलमध्ये

कुख्यात राजबर हा गेल्या सह महिन्यांपासून सोलापूरच्या जेलमध्य होता. त्याच्या फिंगर प्रिंटवरून चिकलठाण्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी निष्पन्न केले. शहरात फ्लॅट फोडण्यासाठी तो पहिल्यांदाच आला होता.

उच्चभ्रू वसाहतीत वावरण्यासाठी ब्रँडेड पेहेराव

उच्चभ्रू वसाहतीमध्ये फ्लॅट फोडून ऐवज चोरण्यात अनिलचा हातखंडा आहे. तो ब्रँडेड वस्तू वापरतो. उच्चभू सोसायटीमध्ये जाण्यासाठी राहणीमानही तो त्याच पद्धतीचे ठेवत असल्याने स्थानिकांना संशय येत नव्हता याचा तो चोरीच्या घटनांत फायदा घेत असे. काही मिनिटांत फ्लॅट फोडून ऐवज लंपास केल्यावर मुंबई गाठायचा.

बारबालाच्या प्रेमात उडविले पैसे

सूत्राच्या माहितीनुसार, कुख्यात गुन्हेगार अनिल राजबर हा अनेक महिन्यांपासून मुंबईत राहत होता. तो एका बारबालाच्या प्रेमात पडला. तिचे लाड पुरविण्यासाठी घरफोड्या करून आलेले पैसे डान्सबारमध्ये उडवू लागला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news