

111 gram panchayats sarpanch post reservation announced
गंगापूर : गंगापूर तालुक्यातील २०२५-२०३० या वर्षासाठी सोमवारी १११ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढण्यात आली. गंगापूर येथील प्रशासकीय इमारतीमध्ये छोटी मुलगी श्रुती वाढे हिच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून सोडत काढण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी अरुण जन्हाड, तहसीलदार नवनाथ वगवाड, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे यांची उपस्थिती होती.
अनुसूचित जाती प्रवर्गातून सरपंचपदासाठी राखीव असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये कासोडा, घोडेगाव, शहापूर, प्रतापपूरवाडी, रांजणगाव पोळ, शिंगी, गणेशवाडी, पिंपळवाडी, तुर्काबाद या गावांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती महिला प्रवर्ग रायपूर, जोगेश्वरी, घाणेगाव, लिंबेजळगाव, लांझी, पिंपरखेडा, गाजगाव, नवाबपूर, टेंभापुरी या गावांचा समावेश आहे. अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी : माळी वाडगाव, आंबेगाव तर अनु. जमाती महिला प्रवर्गासाठी नरहरी रांजणगाव, बाभुळगाव, ममदापूर या ग्रामपंचायतीचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग सरपंचपद राखीव झालेल्या ग्रामपंचायतीमध्ये फतियाबाद, आंबेलोहळ, इटावा. इटावा व घाणेगाव ग्रामपंचायतच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी जुनेच आरक्षण असल्याचे तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी प्रथम स्पष्ट केले. येसगाव, वाळूज बु., मालुंजा खु., महेबुबखेडा, वाहेगाव, लखमापूर, अमळनेर, गुरूधानोरा, नंद्राबाद, दहेगाव, सुलतानाबाद, वरखेड यांचा समावेश आहे.
नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी तांदुळवाडी, देवळी, शिरजगाव, दिनवाडा, किन्हळ, पाचपिरवाडी, दिघी, शिवराई, भालगाव, फुलशिवरा, वसुसायगाव, सि. वाडगाव, अगरकानडगाव, जामगाव यांचा समावेश आहे.
सर्वसाधारण प्रवर्ग : शंकरपूर, पिंपळगाव, सावंगी, शहापूर बंजर, वडगाव टोकी, रांजणगाव शे.पू., गवळ धानोरा, शिरेसायगाव, शिल्लेगाव, शिरेगाव, गवळीशिवरा, खडकनारळा, हैबतपूर, मांजरी, गळनिंब, पुरी, पखोरा, बगडी, बोलेगाव, मांगेगाव, कोडापूर, पेंडापूर, डोमेगाव, भिवधानोरा, सोलेगाव, आसेगाव, भोयगाव, ढोरेगाव, भागाठाण या ग्रामपंचायतींचा समावेश आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर ज्यांना सोयीचे आरक्षण मिळाले असे गावनेते कामाला लागले आहे. यात काही जणांचा मार हिरमोड झाला आहे.
सर्वसाधारण महिला प्रवर्ग धामोरी खु., घामोरी बु., मलकापूर, तळपिंप्री, कणकोरी, कायगाव, डोणगाव, वरझडी, जांभाळा, टाकळी, एकलहरा, जिकठाण, नारायणपुर बु., सिंधी सिरजगाव, बुट्टेवाडगाव, वजनापूर, झोडेगाव, काटेपिंपळगाव, अकोलीवाडगाव, ने-वरगाव, माहुली, मुद्देशवाडगाव, अगरवाडगाव, बावरगाव, भेंडाळा, शेंदुरवादा, सावखेडा, मांडवा यांचा समावेश आहे.